Chandrapur News – ताडोबाचे बफर झोन मोडून हत्ती गावात शिरले, गावकऱ्यांची झाली दमछाक; पाहा Video

Chandrapur News – ताडोबाचे बफर झोन मोडून हत्ती गावात शिरले, गावकऱ्यांची झाली दमछाक; पाहा Video

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात कुकडहेटी गावात शुक्रवारी (30 मे 2025) पहाटेच्या सुमारास दोन रानटी हत्ती आल्याने मोठी खळबळ उडाली होती. हत्तींनी जंगालातून थेट गावात प्रवेश केल्याने हत्तींना पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती. गावकऱ्यांनी आरडाओरडा केल्याने हत्ती काहीसे आक्रमक झाले होते त्यामुळे गावकऱ्यांची चांगलीच दमछाक उडाली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कुकडहेटी गावाला लागून ताडोबाचे बफर क्षेत्र आहे. या बफर क्षेत्राच्या बाहेर येत हत्तींनी पहाटे पहाटे गावात प्रवेश करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. हत्तींना पाहण्यासाठी गावकऱ्यांनी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी केली होती. मात्र, हत्ती आक्रमक झाले आणि गावकऱ्यांच्या दिशेन आल्याने गावकऱ्यांची चांगलीच पळापळ झाली. हत्ती गावात आल्याची माहिती तात्काळ वन विभागाला दिली आणि त्यांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाचे पथक हत्तींना पुन्हा जंगलात हुसकावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मागील आठवड्यात गडचिरोली शहरामध्ये हत्तींनी प्रवेश केला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;