Palghar News – केळवेमध्ये रिसॉर्टमध्ये प्रियकराकडून अल्पवयीन प्रेयसीवर गोळीबार, मुलीची प्रकृती चिंताजनक

Palghar News – केळवेमध्ये रिसॉर्टमध्ये प्रियकराकडून अल्पवयीन प्रेयसीवर गोळीबार, मुलीची प्रकृती चिंताजनक

पालघर जिल्ह्यातील केळवे येथे एका रिसॉर्टमध्ये प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीवर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेत प्रेयसी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर बोईसर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, बंदूक दाखवताना चुकून गोळी सुटल्याचा दावा तरुणाने केला आहे. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

बोईसर येथील रहिवासी असलेल्या 17 वर्षांची मुलगी प्रियकरासोबत केळवे येथील रिसॉर्टमध्ये आली होती. दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास प्रियकराने तिच्यावर गोळी झाडली. मुलीच्या मानेवर ही गोळी लागल्याने प्रचंड रक्तस्राव सुरू झाला. माहिम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तिच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी तिला बोईसर येथील अधिकारी लाईफ लाईन रुग्णालयात नेण्यात आले. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;