Ankita Bhandari Case – तीन वर्षानंतर मिळाला न्याय, अंकिताच्या हत्येप्रकरणी भाजप नेत्याच्या मुलासह तिघांना जन्मठेप

Ankita Bhandari Case – तीन वर्षानंतर मिळाला न्याय, अंकिताच्या हत्येप्रकरणी भाजप नेत्याच्या मुलासह तिघांना जन्मठेप

उत्तराखंडच्या बहुचर्चीत अंकिता भंडारी हत्येप्रकरणी अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने निकाल दिला असून तिन्ही दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पुलकित आर्य, सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता अशी तिघांची नावे आहेत. यापैकी पुलकित आर्य हा भाजप नेते आणि पूर्व राज्य मंत्री विनोद आर्य यांचा मुलगा आहे.

ऋषिकेश येथील वनांत्र रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट अंकिता भंडारी (वय – 19) हिची 2022 मध्ये हत्या झाली होती. भाजप नेत्याचा मुलगा पुलकित आर्य आणि या रिसॉर्टमधील अन्य दोन कर्मचाऱ्यांनी मिळून अंकिताला चिल्ला कॅनलमध्ये ढकलून तिची हत्या केली होती. एका व्हिआयपीला ‘एक्स्ट्रा सर्व्हिस’ देण्यास नकार दिल्याने तिचा खून करण्यात आला होता. हत्येच्या दोन दिवसानंतर तिचा मृतदेह कॅनलमध्ये सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी पुलकितसह तिघांना अटक केली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;