PETA ने ‘जागतिक दूध दिन’ हे नाव बदलण्याची केली मागणी, वाचा सविस्तर
1 जून रोजी जगभरात ‘जागतिक दूध दिन’ साजरा केला जातो. पण PETA ने या दिवसाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या PETA या संघटनेने संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेला (FAO) पत्र लिहून ही मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की जागतिक दूध दिनाचे नाव बदलून ‘जागतिक गोवंश स्तन स्राव दिन’ असे ठेवले पाहिजे.
PETA च्या म्हणण्यानुसार, गाईचे दूध हे प्रत्यक्षात ‘गायीच्या कासेतून निघणारा स्राव’ आहे. हे तथ्य सामान्यांपासून लपवले जाते आणि त्याला दूध असे म्हणतात. लोकांना ते खरोखर काय आहे हे कळावे म्हणून संस्थेने त्याला अधिक पारदर्शक नाव देण्याचा सल्ला दिला आहे.
पेटा उपाध्यक्ष एलिसा एलन यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘जर जागतिक दूध दिनाचा उद्देश दुग्धजन्य पदार्थांबद्दल जागरूकता पसरवणे आहे, तर या नावात अधिक पारदर्शकता हवी. गाईचे दूध हे प्रत्यक्षात गायीच्या कासेतून निघणारा स्राव आहे. गायी गायी आहेत म्हणून दूध देत नाहीत, तर त्या आई आहेत म्हणून, हे दूध प्रत्यक्षात वासरांसाठी आहे माणसांसाठी नाही.
PETA ने असेही म्हटले आहे की, जन्मानंतर लगेचच वासरांना त्यांच्या आईपासून वेगळे केले जाते. यामुळे त्यांना पोषण आणि आईशी असलेल्या भावनिक बंधापासून वंचित ठेवले जाते. गायींना वारंवार दूध देण्यास भाग पाडले जाते, ज्यामुळे त्यापैकी सुमारे 60% गायींना स्तनदाह होतो. शेतात गायी अस्वच्छ परिस्थितीत राहतात, त्यामुळे प्रत्येक लिटर दुधात सुमारे 40 कोटी सोमॅटिक पेशी असू शकतात.
PETA ने नावाबाबत असा प्रस्ताव देण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी केंब्रिज डिक्शनरीमधून उंदराची व्याख्या बदलण्याची मागणी केली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List