मोदी मित्र पुतीन पाकिस्तानच्या पाठीशी, कर्जबाजारी पाकड्यांना रशियाचा 22 हजार कोटींचा बुस्टर
अनेक दशकांपासून हिंदुस्थानचे मित्रराष्ट्र म्हणून रशिया ओळखला जातो. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मित्र राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे पाकिस्तानच्या पाठीशी उभे राहिल्याचे धक्कादायक वृत्त आहे. अर्थव्यवस्था पूर्णपणे गाळात गेलेल्या कर्जबाजारी पाकडय़ांना रशियाकडून तब्बल 22 हजार कोटींचा बुस्टर देण्यात येणार आहे. दरम्यान, रशियाचे हे पाऊल हिंदुस्थानसाठी चिंताजनक मानले जात आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले. तेव्हा सर्वप्रथम रशियाने हिंदुस्थानला पाठिंबा दिला होता. यापूर्वीही अनेकदा रशियाने हिंदुस्थानला खंबीर साथ दिली. मात्र, मोदींचे मित्र पुतीन यांनी पाकिस्तानबरोबर महत्त्वाचा आर्थिक करार केला आहे.
1970 मध्ये कराचीत पूर्वीच्या सोवियत युनियनच्या सहकार्यातून पाकिस्तान स्टील प्लांट (पीएसएम) ही पंपनी सुरू केली होती. 1992 पर्यंत ही पंपनी सुरू होती, मात्र आर्थिक डबघाई, भ्रष्टाचार आणि तांत्रिक बिघाडामुळे ही पंपनी 2015 पासून पूर्णपणे बंद पडली. या स्टील पंपनीची पुन्हा उभारणी करण्यासाठी रशिया आणि पाकिस्तानात करार झाला आहे. हा करार तब्बल 2.6 अब्ज डॉलर्स (सुमारे 22 हजार कोटी) रुपयांचा आहे. रशिया 22 हजार कोटी रुपयांची मदत देण्याबरोबरच स्टील तयार करण्यासाठीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मशिनरीही पाकिस्तानला देणार आहे. रशियाच्या मदतीमुळे पाकडय़ांना आर्थिक बुस्टर डोस मिळणार आहे. पाकिस्तानात होणारी स्टील आयात तब्बल 30 टक्क्यांनी कमी होणार आहे. तसेच ही पंपनी सुरू झाल्यास पाकिस्तानात रोजगारही उपलब्ध होईल.
n पाकिस्तान-रशियाची जवळीक हे मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश आहे. मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी घरोबा वाढवला. ट्रम्प सरकार हिंदुस्थानला पाण्यात जोखतंय. टेरिफ लादतंय. येथून निर्यात झालेले आंबेही परत पाठवतंय. इतकं होऊनही मोदींचे ट्रम्पप्रेम कमी होत नाही. हेच पुतीन यांच्या रोषाचे कारण असल्याचे परराष्ट्र धोरणांतील तज्ञांचे म्हणणे आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List