पाऊस धरण क्षेत्रात कोसळलाच नाही तरी ठाणेकरांना ऑगस्टपर्यंत पाण्याचे नो टेन्शन, भातसात 33 तर बारवीत 36 टक्के पाणीसाठा शिल्लक

पाऊस धरण क्षेत्रात कोसळलाच नाही तरी ठाणेकरांना ऑगस्टपर्यंत पाण्याचे नो टेन्शन, भातसात 33 तर बारवीत 36 टक्के पाणीसाठा शिल्लक

एकीकडे 15 दिवस आधीच दाखल झालेल्या पावसाने पहिल्याच दिवशी मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्याला झोडपून काढले असतानाच हा पाऊस ठाणे जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात मात्र कोसळलाच नाही. तरीदेखील यंदा ठाणेकरांना काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या भातसा धरणात 33 टक्के तर बारवी धरणात 36 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे ठाणेकरांनो, 8 ऑगस्टपर्यंत पाण्याचे टेन्शन घेऊ नका, असे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
15 वर्षांनंतर यंदा पावसाने वेळेआधीच राज्यभरात दमदार हजेरी लावली. पहिल्याच दिवशी मुंबई, रायगड तसेच ठाणे शहरात पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. असे असले तरी मुंबई आणि ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात मात्र पावसाचा जोर वाढलेला नाही. या भागात आतापर्यंत जवळपास अवघा 8 ते 9 मिलीमीटर पाऊस पडला आहे. सध्या भातसा धरणात 314.671 तर बारवी धरणात 122.45 दशलक्ष जलसाठा आहे. मागील वर्षी याचदिवशी भातसात 262.64 तर बारावीमध्ये 100.53 पाणीसाठी होता.

धरणे लवकरच ओव्हरफ्लो
गेल्या वर्षी भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला होता. भातसा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 792.62 दशलक्ष घनमीटर आहे. हे धरण मुंबई आणि ठाणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून यंदादेखील धरणे लवकरच ओव्हरफ्लो होतील, असा विश्वास जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

चांगला पाऊस पडण्याची शक्यता
मे महिना सुरू असूनही पाणी पुरेल एवढा धरणात पाणीसाठा आहे. त्यामुळे सध्या तरी पाणी कपातीचे संकट नाही. दरम्यान पावसाची पुढील स्थिती बघूनच निर्णय घेण्यात येईल. तसेच यंदा जिल्ह्यामध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होईल.

गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक साठा
बारवी धरणातून ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, भिवंडी आणि नवी मुंबईला आणि आजूबाजूच्या परिसराला पाणीपुरवठा केला जातो. बारवी धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 338.84 दशलक्ष लिटर असून यंदा 122.45 जलसाठा आहे. तर मागील वर्षी याचदिवशी हाच 100.53 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 29 टक्के जलसाठा होता. मात्र यंदा 36.13 टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;