भयंकर! प्लायवूड कापण्याच्या कटरने चिरला सहकाऱ्याचा गळा, अल्पवयीन मुलाला अटक

भयंकर! प्लायवूड कापण्याच्या कटरने चिरला सहकाऱ्याचा गळा, अल्पवयीन मुलाला अटक

फ्लॅटमध्ये फर्निचरचे काम सुरू असताना क्षुल्लक वादातून अल्पवयीन मुलाने प्लायवूड कापण्याच्या कटरने सहकाऱ्याचा गळा चिरल्याची भयंकर घटना उघडकीस आली आहे. माणकोली येथील एका फ्लॅटमध्ये हा प्रकार घडला. कैसर अली असे हत्या झालेल्या कामगाराचे नाव आहे, तर नारपोली पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक करून त्याची रवानगी बालनिरीक्षणगृहात केली आहे.

ब्राह्मण आळी परिसरात राहणारे राहुल पारेख यांनी लोढा अप्पर ठाणे येथील कासा टिआरा या इमारतीमध्ये एक फ्लॅट्स खरेदी केला. या सदनिकेत फर्निचर बनवण्याचे काम सुरू आहे. बुधवारी सुतारकाम करणारा कैसर अली व त्याचा अल्पवयीन सहकारी हे काम करीत असताना त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला.

हा वाद इतका विकोपाला गेला की अल्पवयीन मुलाने प्लायवूड कापण्याच्या कटरने कैसरचा गळा चिरला. या घटनेची माहिती मिळताच घरमालक राहुल पारेख यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेऊन त्याची भिवंडी बालनिरीक्षणगृहात रवानगी केली. याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कदम करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;