Cooking Tips- इंदूरला न जाता, घरच्या घरी इंदूरी पोहे बनवण्यासाठी या 5 टिप्सचा वापर करा

Cooking Tips- इंदूरला न जाता, घरच्या घरी इंदूरी पोहे बनवण्यासाठी या 5 टिप्सचा वापर करा

इंदोर आणि तिथली खाऊ गल्ली याची चर्चा आपण खूप ऐकली आहे. इंदूरच्या खाऊ गल्लीतला अनुभव हा खवैय्यांसाठी एक आनंदाची पर्वणी असतो. इंदूर शहर हे खवैय्यांचे आवडते शहर आहे. इंदूरमध्ये खाण्याचे इतके आॅप्शन्स आहेत की, दिवस कमी पडेल. म्हणूनच इंदूरला गेल्यावर, तिथली सकाळ ही तिथल्या पोह्यांनीच उजाडते. इंदूरचे पोहे हे खूप प्रसिद्ध आहेत. हे पोहे आपण घरीसुद्धा बनवु शकतो. इंदूरी पोहे उत्तम प्रकारे बनवण्यासाठी काही थोड्या पण महत्त्वाच्या टिप्स आपण लक्षात ठेवायला हव्यात.

 

Cooking Tips- खमंग आणि मोकळी साबुदाणा खिचडी करण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

 

इंदूरी पोहे बनविण्याच्या टिप्स

पोहे व्यवस्थित धुवून भिजवा.
इंदूरी पोहे भिजवण्याची पद्धत ही वेगळी आहे. इंदूरी पोहे हे पातळ पोहे नसून, मध्यम जाड प्रतीचे पोहे असतात. मुख्य म्हणजे हे पोहे भिजवले जात नसून, यावर केवळ पाणी शिंपडून बाजूला भांड्यात ठेवले जातात. अधिक पाणी झाल्यास, पोहे चिकट होण्याची शक्यता असते.

 

साखर घालायला विसरू नका.
इंदूरी पोहे हे थोडे गोड असतात आणि तो गोडवा फक्त साखरेपासूनच येतो. फक्त लक्षात ठेवा की, त्याचे प्रमाण जास्त नसावे. पोह्यातील मीठ संतुलित करण्यासाठी, थोडा गोडवा आवश्यक आहे.

कांदे मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत परतावे.
इंदूरी पोह्याचा गोडवा कांद्यापासून येतो. कांदे जास्त आचेवर नाही तर मंद आचेवर हलके सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावेत. यामुळे पोह्यांची नैसर्गिक चवही टिकून राहते. शिवाय अशापद्धतीने कांदा परतल्यानंतर पोह्यांना एक सुंदर अरोमाही येतो.

 

शेवटी भुजिया आणि शेव घाला.
इंदोरी पोह्याची खासियत म्हणजे त्यावर वरुन पेरलेल्या भुजिया आणि शेव. रतलामी शेव इथे पोह्यांवर घातली जाते. आपल्याकडे महाराष्ट्रात पोह्यांवर ओले खोबरे खवुन घालतो. परंतु इथल्या पोह्यांवरील रतलामी शेव या पोह्यांची लज्जत अधिक वाढवते.

 

 लिंबू आणि हिरव्या मिरच्यांमध्ये संतुलन राखा.
पोह्यांमध्ये लिंबाचा रस आणि हिरवी मिरची या दोन्ही गोष्टी अतिजास्त किंवा अतिकमी सुद्धा होऊन चालणार नाही. या दोघांमधील व्यवस्थित बॅलन्स राखणं हीच इंदोरी पोह्यांची खासियत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;