Ratnagiri News – रत्नागिरीत अवकाळी पाऊस, राजापुरात वीज पडून दोन कामगार जखमी

Ratnagiri News – रत्नागिरीत अवकाळी पाऊस, राजापुरात वीज पडून दोन कामगार जखमी

रत्नागिरी आणि राजापुरात ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. रत्नागिरीत पहाटे अवकाळी पाऊस पडला. अवकाळी पावसामध्ये राजापूर तालुक्यातील जवळेथर परिसरात वीज पडून दोन कामगार जखमी झाल्याची घटना शुकवारी दुपारी 3.15 वाजता घडली. जखमींना उपारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. प्रकाश अंबाजी मोरे (52), विलास शिवाजी धावडे (43) अशी जखमी झालेल्यीं नावे आहेत.

शुकवारी दुपारनंतर जवळथेर परिसरात वीजांच्या कडकडाटासह पावसाचा शिडकाव झाला. दरम्यान प्रकाश मोरे आणि विलास धावडे हे गावात बांधकाम करत असताना अचानक अंगावर वीज कोसळल्याने ते दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांनाही जवळेथर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपारासाठी दाखल करण्यात आले. त्यांनतर अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी येथील जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;