हिंदुस्थानात परत जा! अमेरिकेत स्थायिक झालेल्या हिंदुस्थानी नेत्याला स्थानिकांनी घेरलं, लग्नाच्या वाढदिवशीच ट्रोल केलं

हिंदुस्थानात परत जा! अमेरिकेत स्थायिक झालेल्या हिंदुस्थानी नेत्याला स्थानिकांनी घेरलं, लग्नाच्या वाढदिवशीच ट्रोल केलं

सोशल माध्यमावर एखादी गोष्ट टाकल्यानंतर, त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे सांगता येत नाही. अमेरिकास्थित हिंदुस्थानी वंशाचे उद्योजक आणि रिपब्लिकन नेते विवेक रामास्वामी यांनी अलीकडेच त्यांची पत्नी अपूर्वासाठी एक खास पोस्ट शेअर केली. या वर्षी त्यांच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाली त्यामुळे त्यांनी ही खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवर अनेकांनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र काहींनी त्यांच्यावर सडकून टीका केलेली आहे.

रामास्वामी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पत्नी अपूर्वासोबतच्या त्यांच्या पहिल्या भेटीची त्यांची आठवण आणि त्यासोबत दोन फोटो शेअर केले आहेत. 2011 मध्ये रामास्वामी त्यांची पत्नी अपूर्वाला पहिल्यांदा भेटले होते. अपूर्वा एक हुशार वैद्यकीय विद्यार्थिनी होती. पहिल्याच भेटीत आम्ही डेटवर जाण्याचे ठरवले. भेटीचे ठिकाण हे नॉर्थ अमेरिकेतील रॉकीजमधील फ्लॅटॉप माउंटन ठरवले तिनेही लगेचच याकरता होकार दिला. आम्ही शिखराच्या अगदी जवळ पोहोचलो तेव्हा एक हिमवादळ आले. त्यामुळे आम्ही पुढे जाऊ शकत नव्हतो. मी पूर्णपणे गोंधळून गेलो, तेव्हा तिने माझा हात धरला. माझ्या डोळ्यात पाहिले आणि मला म्हणाली की आता आपण पुढे जाऊ शकत नाहीए. पण हे शिखर सर करण्यासाठी आपल्याकडे संपूर्ण आयुष्य आहे.

14 वर्ष आणि दोन मुलांनंतर, आम्ही अखेर या आठवड्याच्या शेवटी आमच्या 10 व्या वर्षांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पुन्हा त्याच माऊंटनवर परतलो. मी माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात मिळालेल्या प्रेमाबद्दल आणि आमच्या एकत्र प्रवासाबद्दल प्रत्येक दिवसाचा आभारी आहे, असे रामास्वामी यांनी पोस्टमध्ये लिहले.

अमेरिकेत एच-1बी व्हिसावरून सध्याच्या घडीला वादंग उठले आहे. त्यामुळेच रामास्वामी यांनी याच पार्श्वभूमीवर केलेल्या या पोस्टला विविध संमिश्र प्रतिसाद आलेला आहे. 38 वर्षीय विवेक रामास्वामी हे नैऋत्य ओहायोचे रहिवासी आहेत. त्यांची  आई मानसोपचारतज्ज्ञ आहे आणि तिचे वडील जनरल इलेक्ट्रिकमध्ये अभियंता म्हणून काम करत होते. मूळचे केरळवासीय हे कुटूंब अमेरिकास्थित आहे.

विवेक यांनी त्यांच्या लग्नाच्या १० व्या वाढदिवसाची भावनिक पोस्ट शेअर केल्यानंतर, एकाने परत हिंदुस्थानात जा अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. तर दुसरीकडे एकाने हिंदुस्थानातील पर्यटन स्थळे पाहण्याचा सल्ला दिला आहे. दुसऱ्या एकाने म्हटले की, तुम्हाला देशातून हाकलून लावले पाहिजे. तर काहींनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

अमेरिकेला बुद्धीमान लोकांची आवश्यकता

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची धुरा हाती घेताच अनेक निर्णय घेतले. यादरम्यान त्यांनी H1B व्हिसाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.आपल्या देशात येणारे सक्षम लोक आवडतात. अमेरिकेला बुद्धीमान लोकांची आवश्यकता आहे. जे अमेरिकेत राहून काम करतील आणि तंत्रज्ञान, संशोधन आणि आरोग्य क्षेत्रात देशाला पुढे घेऊन जातील, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.

परदेशी नागरिकांना अमेरिकेचा अल्टिमेटम, 30 दिवसांपेक्षा जास्त काळ राहायचे असेल तर, नोंदणी करा, अन्यथा…

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल