शिंदे व सुरत-गौहाटी ला गेलेल्या त्यांच्या सर्व मंडळीनी…! संजय राऊत यांचा चिमटा, एकनाथ शिंदेंना पाठवली पुस्तकाची प्रत

शिंदे व सुरत-गौहाटी ला गेलेल्या त्यांच्या सर्व मंडळीनी…! संजय राऊत यांचा चिमटा, एकनाथ शिंदेंना पाठवली पुस्तकाची प्रत

ईडीने बेकायदेशीररित्या तुरुंगात टाकलेले असताना 100 दिवसात आलेल्या अनुभवांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांचे ‘नरकातील स्वर्ग’ हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. त्याच सोबत खुद्द संजय राऊत यांनी राज्यातील विविध नेत्यांना आपल्या पुस्तकाची प्रत पाठवून झणझणीत अंजन घालण्याचे काम केल्याचे बोलले जात आहे.

शुक्रवारी, सकाळी संजय राऊत यांनी आपल्या X हँडलवरून एक पोस्ट केली आहे. ‘शुभ प्रभात,माझे एकेकाळचे मित्र व त्याच काळातील शिवसेनेतील सहकारी एकनाथ शिंदे यांना “नरकातला स्वर्ग” या पुस्तकाची प्रत पाठवली. शिंदे व सुरत गौहाटी ला गेलेल्या त्यांच्या सर्व मंडळीनी हे पुस्तक जरूर वाचावे… जय महाराष्ट्र’, असे म्हणत त्यांनी शिंदे गटाला चिमटा घेतला आहे. सोबत पुस्तकाचा आणि जोडलेल्या पत्राचा फोटो देखील टाकला आहे.

पुस्तक पाठवताना सोबत जोडलेले पत्र पुढील प्रमाणे आहे:

श्री. एकनाथ शिंदे,

जय महाराष्ट्र!

‘नरकातील स्वर्ग’ या माझ्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पार पडले.

श्री. जावेद अख्तर, श्री. शरद पवार, श्री. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रकाशनाचा दिमाखदार सोहळा पार पडला. जुलमी व लोकशाही न मानणाऱ्या सरकारने मला एका खोट्या प्रकरणात 100 दिवसांसाठी तुरुंगात पाठवले. राजकीय विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रकार अमानुष होता. ‘ईडी’सारख्या तपास यंत्रणांचा जुलूम सहन करून, संघर्ष करून मी संकटातून बाहेर पडलो. या संघर्षात माझ्या कुटुंबाची ससेहोलपट झाली. या प्रवासातील अनेक घटनांचे आपण एक साक्षीदार नक्कीच आहात. तुरुंगातील खडतर अनुभव आणि चिंतनातून या पुस्तकाची निर्मिती झाली. आपल्या अवलोकनार्थ पुस्तकाची प्रत पाठवत आहे. ‘ईडी’, ‘सीबीआय’ वगैरे भाजप पुरस्कृत तपास यंत्रणांच्या मनमानीस भीक न घालता स्वाभिमान टिकवता येतो हे या पुस्तकातून सांगण्याचा माझा प्रयत्न आपणास नक्कीच आवडेल!

कळावे,
आपला नम्र,
संजय राऊत

Sanjay Raut sends his new book “Narkatil Swarg” detailing his 100-day ED custody to Maharashtra CM Eknath Shinde and other MLAs who went to Surat-Guwahati, taking a dig at the split in Shiv Sena.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;