प्रेमासाठी वाट्टेल ते… पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसाठी राजकुमारीला नाकारले

प्रेमासाठी वाट्टेल ते… पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसाठी राजकुमारीला नाकारले

प्रेमात आकांत बुडालेल्या व्यक्तीला प्रेमाशिवाय दुसरे काहीच दिसत नाही, असे म्हणतात. स्पेनमध्ये याचा प्रत्यय नुकताच आला आहे. स्पेनचा स्टार फुटबॉलर पाब्लो गावीने गर्लफ्रेंड एना पेलायोसाठी स्पेनच्या राजकुमारीचा लग्नाचा प्रस्ताव धुडकावून लावल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. स्पेनमध्ये पाब्लो गावीचा मोठा चाहता वर्ग आहे. यात स्पेनची राजकुमारी लियोनोरचासुद्धा समावेश आहे. पाब्लो गावी हा बार्सिलोनाचा स्टार मिडफिल्डर खेळाडू आहे.

स्पेनने 2024 मध्ये युरो कप जिंकला. त्यात गावीचासुद्धा समावेश होता. जर्जुएला पॅलेस दौऱ्यात गावी आणि लियोनोर यांची भेट झाली होती. दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलनसुद्धा केले होते. त्यानंतर अशी अफवा पसरली की, राजकुमारीचे वडील फेलिप यांनी आपल्या राजुकमारी मुलीसाठी गावीशी बोलणे केले, परंतु गावीने लियोनोरशी लग्न करू शकत नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगितले. राजकुमारीसोबत विवाह केला तर फुटबॉलरचे करीअर उद्ध्वस्त होईल, अशी भीती गावीला होती. बार्सिलोनाने नुकतेच ला लीगाचा किताब जिंकला. त्यानंतर होम ग्राऊंडवर चाहत्यांसोबत विजय साजरा करण्यात आला. या वेळी त्याची गर्लफ्रेंड एना पेलायोसुद्धा दिसली. त्यामुळे पुन्हा एकदा राजकुमारीचे नाव चर्चेत आले.

कोण आहे एना पेलायो

स्टार फुटबॉलर पाब्लो गावीची गर्लफ्रेंड एना पेलायो ही 22 वर्षांची तरुणी असून ती एक विद्यार्थिनी आहे. तसेच इन्फ्लुएन्सर म्हणूनसुद्धा सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. फुटबॉलर गावीसोबत डेटिंग करत असल्यामुळे ती सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. पेलायो सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या व्हिडिओला चांगला प्रतिसादही मिळत आहे. पाब्लो गावीची बहीण आरोडा हिने सर्वात पहिल्यांदा या दोघांची भेट घडवून आणली होती. त्यानंतर दोघांच्या कुटुंबाचे सदस्य सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;