हिंदुस्थानच्या 2 जवानांचा संयुक्त राष्ट्रात सन्मान
हिंदुस्थानातील दोन शहीद जवानांचा संयुक्त राष्ट्र सन्मान करण्यात आला आहे. सर्वोच्च समजला जाणारा डॅग हॅमर शोल्ड पदक देऊन या दोन शहीद जवानांचा सन्मान केला. ब्रिगेडियर अमिताभ झा आणि हवालदार संजय सिंह अशी या दोन शहीद जवानांची नावे आहेत. ज्या जवानांनी संयुक्त राष्ट्राच्या बॅनरखाली शांतता स्थापनेसाठी आपल्या जिवाचे बलिदान दिले आहे, अशा जवानांचा सन्मान करणे हे संयुक्त राष्ट्राचे कर्तव्य आहे.
संयुक्त राष्ट्राच्या सर्वात मोठ्या सन्मानापैकी हा एक सन्मान आहे. ब्रिगेडियर झा हे संयुक्त राष्ट्र विघटन पर्यवेक्षक दलाशी जोडले होते. ते गोलान हाइट्समध्ये तैनात होते. त्यांचे काम त्या ठिकाणी संवेदनशील परिस्थिती आणि युद्धविरामावर लक्ष ठेवणे होते, तर दुसरे शहीद जवान हवालदार संजय सिंह हे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये तैनात होते. ते मोनुस्को म्हणजेच संयुक्त राष्ट्राच्या स्थिरीकरण मिशनचा एक भाग होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List