अशोक सराफ यांना भाचीने दिले सरप्राईज

अशोक सराफ यांना भाचीने दिले सरप्राईज

मराठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार सोहळा पार पडल्यानंतर अशोक सराफ मुंबईला येताना ज्या विमानात बसले होते, त्याची पायलट कॅप्टन अदिती परांजपे होती. अदिती ही निवेदिता सराफ यांची भाची आहे. दरम्यान, फ्लाइटमध्ये अदितीने खास उद्घोषणा करून अशोक सराफ यांचे अभिनंदन केले. यानंतर फ्लाइटमध्ये उपस्थित प्रवाशांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

विमानात अदिती हिने भावना व्यक्त केल्या. अदिती म्हणाली, ‘‘नमस्कार! मी फ्लाइट कॅप्टन अदिती परांजपे. दिल्ली टू मुंबई या विमान प्रवासात तुमचे सर्वांचे स्वागत. आजचा हा प्रवास माझ्यासाठी खूप विशेष आहे. कारण माझे काका अशोक सराफ हे माझ्याबरोबर या विमानातून प्रवास करत आहेत. ज्यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आले आहे. याचा मला अभिमान वाटत आहे.’’

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;