व्होट फ्रॉम होम सुविधेत मतांशी छेडछाड होण्याची शक्यता, निवडणूक आयोगाला पत्र

लोकसभा निवडणुकीची धामधूम आता सुरू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत घरून मतदान करण्याची सोय देण्यात आली असून त्यावर आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत. या सुविधेचा गैरफायदा घेऊन मतांशी छेडछाड होण्याची शक्यता आहे, असं पत्र निवडणूक आयोगाला लिहिण्यात आलं आहे.

हे पत्र केरळचे ज्येष्ठ काँग्रेस नेते व्ही. डी. सतीशन यांनी लिहिलं असून त्यावर ठोस उपाय करण्याची मागणीही त्या पत्रात केली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी संजय कौल यांना बुधवारी हे पत्र सतीशन यांनी पाठवलं आहे. त्यात ते लिहितात की, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नागरिकांना तसंच दिव्यांग मतदारांना घरून मतदान करण्याची जी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, तिचा दुरुपयोग करून मतांशी छेडछाड होण्याची शक्यता आहे, असं सतीशन यांनी म्हटलं आहे.

ही सुविधा केरळ विधानसभेच्या 2021च्या निवडणुकांमध्येही देण्यात आली होती. त्यावेळी या सुविधेचा खूप मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग करण्यात आला. त्यामुळे अशा प्रकारच्या मतदानासाठी फक्त मतदार ओळखपत्रावर विसंबून न राहता मतदाराच्या वयाची पडताळणी करण्यासाठी आधार कार्डासह अन्य दस्तऐवजही अनिवार्य करण्यात यावेत, अशी सूचनाही सतिशन यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्राचा शाप काय असतो ते अनुभवावं; उद्धव ठाकरे यांचा मोदींवर हल्लाबोल महाराष्ट्राचा शाप काय असतो ते अनुभवावं; उद्धव ठाकरे यांचा मोदींवर हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यात फिरत आहेत. उद्या ते गल्लीतही फिरतील. त्यांनी गल्लीतही रॅली करावी. त्यांनी महाराष्ट्र बघावा. महाराष्ट्राचं प्रेम...
सुनील गांधी यांचे निधन
भर उन्हाळय़ात साथीच्या आजारांचा ताप; झोपडपट्टय़ांच्या ड्रममध्ये डेंग्यू, मलेरियाचा दबा!
रायगडात अवकाळीचा तडाखा; पोलादपूर तालुक्यात पावसाची हजेरी
साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 12 मे ते शनिवार 18 मे 2024
रोखठोक – सजन रे झूठ मत बोलो…
मोदी स्वतःसाठी नाही तर अमित शहांसाठी मत मागतायत; अरविंद केजरीवाल यांचा दावा