महाराष्ट्राने बंड केलं तर तुम्हाला गुजरातमध्येही राहणं मुश्कील होईल, संजय राऊत यांचा घणाघात
”मोदी व शहा महाराष्ट्रातील रोजगार गुजरातला पळवत आहे. पण जर या महाराष्ट्राने बंड केलं तर तुम्हाला गुजरातमध्येही राहणं मुश्कील होईल, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मोदी शहांवर केला. नाशिक येथे प्रचार सभेत बोलताना त्यांनी मोदी शहांवर जोरदार टीका केली.
”भाजप म्हणते आम्ही चारशे जागा जिंकू, तुमच्या बापाची लोकशाही आहे का? दीडशे जागा जिंकून दाखवा. नरेंद्र मोदी हे एक नंबरची खोटारडी व्यक्ती आहे. तुम्ही गुगलवर फेकू टाईप करा, समोर येतील मोदी. ही आहे या देशाच्या पंतप्रधानांची प्रतिमा. संसदेत एक प्रस्ताव मांडायला पाहिजे की फेकाफेकीचा खेळ ऑलिम्पिकमध्ये सामिल करा. नरेंद्र मोदींना गोल्ड मेडल मिळेल, जलद खोटं बोलणारा माणूस. वेगवान व्यक्ती. देशाची प्रतिमा जगात काय केली आहे यांनी. इथे जाहीराती चालतात काय तर पापा वॉर रुकवा दी. ते बोलतात मोदींनी युक्रेनसोबतचं वॉर थांबवलं. आज सकाळी बातमी वाचली युक्रेनमध्ये दहा लोकं मारली गेली. मग युद्ध कुठे थांबले आहे. इतकी ही अंध भक्त. यांना मणिपूरची दंगल संपवता येत नाही. कश्मीरमध्ये पंडितांना घरी पाठवता येत नाही, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
”मोदींनी आरोप केले की अंबानी व अदानी यांनी राहुल गांधींना टेम्पोतून काळा पैसा दिला. जर यांनी युद्ध थांबवले तर यांना टेम्पो नाही थांबवता आला. जर ते काळा पैसा देत आहेत तर मग करा अदानी व अंबानीला अटक. ईडी सीबीआयला सांगा त्यांना अटक करायला. करा त्यांच्यावर कारवाई. आहे का हिंमत? हा देश मोदींनी व शहांनी नामर्दांचा देश केलाय. जो देश स्वाभिमानाने आपल्या पायावर उभा आहे. देशाच्या राज्यकर्त्यांनी संकट झेलू शकेल अशी प्रतिमा निर्माण केलेली आहे. देश मोदींनी खड़्ड्यात घातला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
”महाराष्ट्रावर सूड घेण्याचे काम सुरू आहे. देशात कुणीही यावं रोजगार मिळेल अशी आमची ख्याती होती. त्याच मोदींनी महाराष्ट्रातील सर्व उद्योग गुजरातला पळवले. हे महाराष्ट्राचं नुकसान मोदीजींनी केलं. महाराष्ट्र मराठी माणसाला कंगाल भिकारी करायचं असं धोरण या दोघांनी राबवलंय. छत्रपती शिवाजी महाराज याचा इतिहास नष्ट करायचा आहे यांना. महाराष्ट्राने बंड केलं तर तुम्हाला गुजरातमध्येही राहणं मुश्कील होईल. चार जूनला मोदींना रिटार्यड करायचे आहे. एकनाथ शिंदे अजित पवार देखील उरणार नाहीत. आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही, तुरुंगात गेलो पण तुमच्यापुढे झुकलो नाही. मी ईड़ी वाल्यांना सांगितले की तुम्ही चुकीच्या व्यक्तीसोबत पंगा घेतला आहे. बाहेर आलो की मी अजून पेटलेला असेन. आमची सत्ता आली तर ईडी सीबीआय आहे आणि आम्ही ज्या कोठडीत राहिलो ती कोठडी देखील आहे”, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List