किनवटच्या भाजी मार्केटमध्ये पतीने पत्नीला पेटविले
किनवट शहरालगतच्या गोकुंदा परिसरातील दत्तनगरातील एका युवकाने स्वतःच्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिल्याची खळबळजनक घटना किनवट पालिकेच्या भाजी मार्केटमध्ये शनिवारी दि.11 सायं.साडेसातच्या सुमारास दत्तनगर गोकुंदा येथील रहिवाशी असलेली 35 वर्षीय महिला शनिवारी सायंकाळी ७ च्या दरम्यान गोकुंदा येथून भाजीपाला खरेदीसाठी किनवट पालिकेच्या भाजी मार्केटमध्ये आली होती.भाजीपाला,मसाले व अन्य दुकानांनी गजबजलेल्या मार्केटमधून ती महिला भाजीपाला घेवून घराकडे परतत असताना तिच्या मागावर असलेला तिचा पती अर्जुन सातपुते हा सोनपापडीच्या डब्यात पेट्रोल घेवून आला.त्याने भर बाजारातच पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले.या घटनेत ती महिला चांगलीच भाजली. प्रसंगावधान राखत व्यापाऱ्यांनी पाणी ओतून महिलेला वाचविले.या घटनेनंतर आरोपी अर्जुन फरार झाला.व्यापारी व नागरिकांनी पोलिसांना फोन केल्यानंतर बऱ्याच उशिराने पोलीस घटनास्थळी दाखल झाले.गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने पोलीस वाहनातून जळीत महिलेला उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.भाजलेल्या महिलेस ३ अपत्य असल्याचे सांगण्यात आले.अर्जुन सातपुते याने पत्नीला का पेटविले,याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.रात्री उशिरापर्यंत अर्जुन हा पोलिसांच्या हाती लागला नव्हता.दरम्यान,जळीत महिलेची तब्येत खालावल्याने रात्री उशिरा तिला आदिलाबादला हलविण्यात आल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात किनवटचे डीवायएसपी रामकृष्ण मळघणे यांच्या टीमने परिश्रम घेत आरोपी अर्जुन सातपुते याला जेरबंद केले.रात्री उशिरा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी किनवट येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List