पोलिसाला चिटर, लाचखोर म्हणणे म्हणजे बदनामीच; हायकोर्टाचा प्रोसेस रद्द करण्यास नकार

पोलिसाला चिटर, लाचखोर म्हणणे म्हणजे बदनामीच; हायकोर्टाचा प्रोसेस रद्द करण्यास नकार

चिटर, लाचखोर म्हणणे म्हणजे पोलिसाची बदनामी करण्यासारखेच आहे, असा निर्वाळा देत उच्च न्यायालयाने एका आरोपीविरोधातील प्रोसेस रद्द करण्यास नकार दिला.

माहिम येथील नरेश कन्हैयालाल राजवाणी यांच्याविरोधात पोलीस उप निरीक्षक मधुकर थावण यांनी बदनामीची खाजगी तक्रार कुर्ला महानगर दंडाधिकारी यांच्याकडे केली आहे. त्याची दखल घेत कुर्ला न्यायालयाने राजवाणी याच्याविरोधात प्रोसेस जारी केले.

या प्रोसेसला राजवाणीने सत्र न्यायालयात अर्ज करुन आव्हान दिले. सत्र न्यायालयाने राजवाणीचा अर्ज फेटाळला. राजवाणीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. हे प्रोसेस रद्द करण्याची मागणी राजवाणीने केली. न्या. एन. आर. जमादार यांच्या एकल पीठाने ही मागणी मान्य केली नाही.

काय आहे प्रकरण

थावण हे चेंबूर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना राजवाणीच्या संपका&त आले. राजवाणी रिअल इस्टेट एजंट आहे. थावण त्याच्यामार्फत दुकान घेणार होते. नंतर त्यांच्यात वाद झाला. पण राजवाणीने थावण यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) व वरीष्ठांकडे तक्रार केली. थावण यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता आहे, असा आरोप राजवाणीने केला. एसीबीने याची चौकशी केली. थावण यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता नसल्याचे स्पष्ट झाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;