सुनील गांधी यांचे निधन
बोरिवली पश्चिम येथील वृत्तपत्र विक्रेते सुनील गांधी (52) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या बुधवारी अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, वहिनी, पुतणे, पुतणी असा परिवार आहे. गेल्या बारा वर्षांपासून सुनील गांधी हे बोरीवली पश्चिम येथे वृत्तपत्र विक्रीचे काम करीत होते. त्यांच्या निधनामुळे वृत्तपत्र व्यवसायात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List