श्रीगोंदा शहरात अवकाळी पाऊस, सुजय विखे यांच्या सांगता सभेवर पाणी फिरले

श्रीगोंदा शहरात अवकाळी पाऊस, सुजय विखे यांच्या सांगता सभेवर पाणी फिरले

श्रीगोंदा शहरात दुपारी तीन वाजता भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन केले होते. परंतु दुपारी 2:45 वाजता सोसाट्याच्या वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरू झाल्याने सभा सुरू होण्यापूर्वीच स्टेज सह मंडपात पावसाचे पाणी शिरले तर वाऱ्यामुळे सभामंडपही पडला तर खुर्च्याही अस्ताव्यस्त झाल्या अचानक आलेला जोराचा पाऊस आल्याने मंडपा खाली चिखल होऊन पाणी वाहू लागले. महिला पुरुष कार्यकर्ते व नेते मंडळी याचे कपडे भिजल्याने यांना सभा स्थळावरून पळ काढावा लागला. सुमारे 4 वाजून गेले तरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे श्रीगोंद्यात पोहचले नव्हते सांगता सभा अचानक आलेल्या अवकाळी पावसाने उधळून लावली.

श्रीगोंदा तालुक्याला कुकडीचे पाणीच न मिळाल्याने माणसासह जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे यातच शेतकऱ्याच्या शेतातील चारा पिकासह फळबागाही जळू लागल्या होत्या. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. राज्य सरकारने मारले पण निसर्गाने तारले अशी चर्चा सभा स्थळी शेतकरी वर्गातून होत होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;