प्रज्ज्वल रेवन्नाने व्हिसाशिवाय देश कसा सोडला; कर्नाटक सरकारकडून ब्लू कॉर्नर नोटीस जारी
जनता दल (सेक्युलर) खासदार प्रज्ज्वल रेवन्ना यांच्यावरील लैंगिक शोषण प्रकरण देशभरात गाजत आहे. रेवण्णाकडे जर्मनीचा व्हिसा नसतानाही त्याने देश कसा सोडला आणि जर्नीत कसा पोहचला, असे प्रश्नही उपस्थित होत आहेत. तर रेवण्णाच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही आले होते. त्यावरून मोदी आणि भाजपवर टीका होत आहे. तसेच रेवण्णा देशातून पळून गेला, ही कर्नाटक सरकारची जबाबदारी आहे, असे सांगत भाजपने स्वतःने जबाबदारी झटकली आहे. कर्नाटक सरकारने रेवण्णाविरोधात ब्लू कॉर्नचर नोटीस जारी केली आहे.
रेवण्णाकडे राजनैतिक पारपत्र (डिप्लोमॅटिक पासपोर्ट) असल्याने तो देशाबाहेर पडल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्याविरोधातील तपास सुरू असतानाही या पासपोर्टच्या मदतीने तो देशाबाहेर पडला आहे. कर्नाटक सरकारने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रेवण्णाचे राजनैतिक अधिकार रद्द करण्याची विनंती केली आहे. रेवण्णाचे हे अधिकार रद्द झाल्यास त्याला जर्मनीतून हिंदुस्थानात परत आणून त्यांची चौकशी करता येईल. प्रज्ज्वल रेवन्ना हा माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू आहे.
डिप्लोमॅटिक पासपोर्ट नियमित पासपोर्टपेक्षा वेगळे असतात. राजनैतिक विशेषाधिकारांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत त्यांना वेगळे अधिकार असतात. हे पासपोर्ट परराष्ट्र मंत्रालयाद्वारे जारी केले जातात. सर्वसामान्य नागरिकांना आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी व्हिसाची गरज असते. तर डिप्लोमॅटिक पासपोर्ट धारकांना काही देशांमध्ये सूट मिळते. प्रज्ज्वल रेवन्ना प्रकरणामुळे 2011 मध्ये जर्मनीसोबत भारताचा व्हिसा सूट करार झाल्याची माहिती मिळाली आहे. या कराराद्वारे भारतीय राजनैतिक पासपोर्ट धारकांना 90 दिवसांपर्यंत व्हिसाशिवाय जर्मनीत राहण्याची परवानगी असते. त्यांना व्हिसामध्ये सूट असूनही डिप्लोमॅटिक पासपोर्ट असलेल्या व्यक्तींना परदेशात खाजगी भेटींसाठी जाण्याआधी राजकीय मंजुरी घेणे गरजेचे असते.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रज्ज्वल रेवन्ना यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले आहे. पासपोर्ट कायदा 1967 नुसार, पासपोर्ट प्राधिकरण विशिष्ट परिस्थितीत डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करण्यात येऊ शकतो. त्यात पासपोर्ट फसव्या मार्गाने मिळवला असेल किंवा धारक चुकीच्या पद्धतीने ताब्यात असेल तर तो रद्द करताय येतो. देशाच्या सार्वभौमत्वाच्या, अखंडतेच्या किंवा इतर देशांसोबतच्या मैत्रीपूर्ण संबंधांच्या हितासाठी आवश्यक वाटल्यास पासपोर्ट रद्द करता येतो. पासपोर्ट जारी झाल्यानंतर धारक दोषी ठरला आणि त्याला दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी कारावासाची शिक्षा झाली, तरही पासपोर्ट रद्द करता येतो. धारकाच्या विरुद्ध फौजदारी कारवाई दरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करता येतात.
Prajwal Revanna case : प्रज्ज्वल रेवन्नाचे ‘सेक्स स्कँडल’ बाहेर काढणाऱ्या भाजप नेत्याला अटक
प्रज्वल रेवण्णाला हिंदुस्थानात परत आणून त्याची चौकशी करण्यासाठी कर्नाटक सरकारने प्रज्वल रेवन्ना विरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. जो जर्मनीत असल्याचे सांगितले जात आहे. ब्लू कॉर्नर नोटीस हा इंटरपोलच्या कलर-कोडेड नोटिसचा एक भाग आहे जो देशांना जगभरातील माहितीसाठी सूचना आणि विनंत्या शेअर करण्यात येतात. एखाद्या व्यक्तीची ओळख, स्थान किंवा गुन्हेगारी तपासातील क्रियांबद्दल अतिरिक्त माहिती गोळा करण्यासाठी ब्लू कॉर्नर नोटीस दिली जाते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List