देवगडमधील कुणकेश्वर मंदिरात हापूस आंब्यांची आकर्षक आरास; सुंगधाने परिसर दरवळला

देवगडमधील कुणकेश्वर मंदिरात हापूस आंब्यांची आकर्षक आरास; सुंगधाने परिसर दरवळला

दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवगडमधील कुणकेश्वर मंदिरात हजारो हापूस आंब्यांची आरास करण्यात आली. सिंधुदुर्गच्या कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने कुणकेश्वराच्या चरणी हजारो आंब्यांची सजावट करण्यात आली. मंदिराच्या गाभाऱ्यात आणि पिंडी सभोवताली हजारो आंब्यांची आकर्षक आरास करण्यात आली. हजारो हापूस आंब्याच्या सुगंधाने मंदिर परिसर दरवळून गेला होता.

कुणकेश्वर, मिठमुंबरी तसेच तालुक्यातील बागायतदारांनी हापूस आंब्याच्या पेट्या श्री देव कुणकेश्वर मंदिरात आरास करण्यासाठी स्वखुशीने दिल्या होत्या. यावर्षी सातत्याने वातावरणात होणारे बदल, अतिउष्णता यामुळे आंबा पीक कमी आले आहे. तरीही बागायतदारांनी कुणकेश्वर मंदिर गाभाऱ्यात शिवलिंगाभोवती सजावट करण्यासाठी देवगडचे हापूस आंबे दिले. कुणकेश्वर मंदिरात आंब्यांची आरास गेल्या दहा वर्षांपासून केली जात आहे. कुणकेश्वर मंदिर पांडवकालीन मंदिर आहे. या मंदिराची बांधणी वास्तुकलेचा सुंदर नमुना आहे.

आंबा सजावटीसाठी विशेष प्रयत्न कलाकार अनिकेत पेडणेकर,संकेत चव्हाण, प्रतीक ठुकरुल,दर्शन सुतार,स्वप्निल सुतार,प्रसाद गोडबोले तसेच कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांनी विशेष सहकार्य घेतले. अनिकेत पेडणेकर यांनी सांगितले की, गेली दहा वर्ष कुणकेश्वर मंदिरामध्ये आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावेळी कुणकेश्वर मंदिरामध्ये आंब्याची आरास करण्याचे भाग्य मला लाभले असून माझ्या कलेच्या माध्यमातून ही कुणकेश्वराची छोटी सेवा करण्याचा मी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. यामधून देवगडच्या हापूस आंब्याची महती सातासमुद्रापार जात आहे. याचा अभिमान असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;