रायगडात अवकाळीचा तडाखा; पोलादपूर तालुक्यात पावसाची हजेरी
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पोलादपूर तालुक्यासह शहराला वादळीवाऱयासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे आंबा व काजू पिकाला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील नागरिकांची एकच तारांबळ उडाली. तसेच जोरदार पडलेल्या पावसामुळे पोलादपूर शहरातील काही भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटनाही घडल्या. काही काळ वीजपुरवठादेखील खंडित करण्यात आला होता. सध्या आंबा व काजू पीक चांगल्या प्रकारे तयार झाले आहे. मात्र अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱयामुळे आंबा व काजू पिकाला फटका बसण्याची शक्यता शेतकरीवर्गाकडून वर्तवली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List