अट्टल दुचाकी चोर गजाआड ,चोरीच्या 6 दुचाकी जप्त
>> प्रसाद नायगावकर
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे . त्यामुळे पोलीस या दुचाकी चोरांच्या विरुद्ध ऍक्शन मोडवर आली आहे . अशातच तपास करीत असताना अवधूतवाडी पोलिसांनी एका अट्टल दुचाकी चोराला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून तब्बल 6 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.
अल्पावधीत पैसे कामाच्या नादात काही तरुण चोरी करीत आहेत . गेल्या काही दिवसांपासून गाडी चोरून त्याची नंबर प्लेट बदलून ती दुसऱ्या ठिकाणी अत्यल्प किमतीत विकायची असा गोरखधंदा वाढीस लागला आहे. दुचाकी चोरीच्या या वाढत्या घटनेमुळे नागरिक मात्र पुरते हैराण झाले आहे. अशातच अवधूतवाडी पोलिसांनी एका अट्टल दुचाकी चोरट्याला अटक केली आहे. दुचाकी स्वारांवर नजर ठेवून पार्क केलीली गाडी मालकांच्या लक्षात येण्याआधीच तो चोरी करून रफूचक्कर व्हायचा. एका गोपनीय माहितीच्या आधारे या चोरट्यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कसून चोकशी अंती आणखी चोरीच्या गाड्यांचा तपास लागू शकतो असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे .
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक यवतमाळ डॉ. पवन बनसोड साहेब, अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश भैसाने साहेब यांचे मार्गदर्शनात ठाणेदार नरेश रणधीर, सपोनि रामकृष्ण भाकडे, सपोनि रोहीत चौधरी, विशाल भगत ,रवी खांदेव, बलराम शुक्ला , प्रशांत गेडाम, रूपेश ढोबळे, . कमलेश भोयर , सागर चिरडे, रशीख शेख इत्यादींनी केली आहे .
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List