उद्धव ठाकरे यांनी मांडली पालघरच्या विकासाची ब्लू प्रिंट; वाढवण बंदर केंद्राच्या कागदावरूनच पुसून टाकणार

उद्धव ठाकरे यांनी मांडली पालघरच्या विकासाची ब्लू प्रिंट; वाढवण बंदर केंद्राच्या कागदावरूनच पुसून टाकणार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पालघरच्या जनतेशी झंझावाती जनसंवाद साधला. सकाळी 11 वाजल्यापासून सुरू झालेला हा जनसंवाद सायंकाळी 4 वाजेपर्यंत अखंड पाच तास सुरू होता. पालघरमधील असंख्य संघटना, संस्था व समाजाचे प्रतिनिधी उद्धव ठाकरे यांना येऊन भेटत होते आणि उद्धव ठाकरे त्यांच्याशी संवाद साधताना त्यांचे यथोचित समाधानही करत होते. सर्वांच्या मागणीत एकच विषय होता, ‘वाढवण बंदर रद्द करा.’ हाच धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी वाढवण बंदर केंद्र सरकारच्या कागदावरून पुसून टाकणारच असे दृढ वचन दिले. इतकेच नव्हे मुरबे धरणाचे भूतही पालघरवासीयांच्या डोक्यावर बसू पाहत आहे, तेही रद्द करणारच, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी पालघरवासीयांना दिली. पाच तास झालेल्या या मॅरेथॉन जनसंवादात उद्धव ठाकरे यांनी पालघरच्या विकासाची ब्लू प्रिंटच मांडली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भीमशक्ती, इंडिया आघाडी गठबंधन व महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी आज पालघरवासीयांशी जलदेवी रिसॉर्ट येथे जनसंवाद साधला. सकाळी 10.30 वाजता उद्धव ठाकरे यांचे पालघरमध्ये आगमन झाले आणि त्यानंतर 11 वाजल्यापासून ते थेट सायंकाळी 4 वाजेपर्यंत हा जनसंवाद सुरू होता.

यावेळी पालघरमधील वकील संघटना, मुस्लिम संघटना, शेतकरी आणि बागायतदार, रेल्वे प्रवासी सेवा मंडळ, ख्रिश्चन संघटना, बौद्ध समाज, व्यापारी संघटना, हॉटेल असोसिएशन, कामगार संघटना, ताडी -माडी विक्री संघटना, पालघर रिक्षा चालक-मालक संघटना यासह असंख्य संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक संस्थेच्या व संघटनेच्या शिष्टमंडळाला विशेष वेळ देऊन त्यांच्याशी टप्प्याटप्प्याने संवाद साधला.

यावेळी शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत, उपनेत्या ज्योती ठाकरे, सचिव मिलिंद नार्वेकर, संपर्कप्रमुख मिलिंद वैद्य, बबनराव थोरात, उमेदवार भारती कामडी, राष्ट्रवादीचे आमदार सुनील भुसारा, माकपचे आमदार विनोद निकोले, किसान काँग्रेसचे अध्यक्ष पराग पष्टे, सहसंपर्कप्रमुख नीलेश गंधे, जिल्हाप्रमुख विकास मोरे, राजेंद्र पाटील, पालघर जिल्हा संघटक ममता चेंबूरकर, जिल्हा परिषद गटनेते जयेंद्र दुबळा, माजी गटनेते पैलास म्हात्रे, समन्वयक उत्तम पिंपळे, पालघर रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष मनोज घरत, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पटेल, संगीता धोंडे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

स्थानिक मच्छीमार आणि भूमिपुत्रांना देशोधडीला लावणाऱया वाढवण बंदराचे संकट पालघरवासीयांच्या डोक्यावर घोंगावत असतानाच आता जेएसडब्ल्यू पंपनीसाठी मुरबे बंदरही पालघरवासीयांच्या माथ्यावर मारण्याच्या हालचाली पेंद्र सरकारने सुरू केल्या आहेत. मुरबे बंदर झाले तर मुरबे गाव पाण्याखाली जाईल. बोटींना जायला मार्गच मिळणार नाही. शेतीही उद्ध्वस्त होईल आणि छोटय़ा मच्छीमारांची नाकाबंदी होईल असा आक्रोश मच्छीमारांच्या संघटनांनी केला.

पालघर हा ताडी उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जात असे, मात्र आता या व्यवसायाला सरकारच्या अनास्थेमुळे घरघर लागल्याची पैफियतही मांडण्यात आली. रिक्षा चालक संघटना, कामगार संघटना, ख्रिश्चन, बौद्ध समाज, रेल्वे प्रवासी सेवा मंडळ अशा सगळय़ा संस्थांच्या प्रतिनिधींशी उद्धव ठाकरे अखंडपणे संवाद साधत होते. तुम्हाला न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे वचन उद्धव ठाकरे यांनी दिले.

न्याय देण्यासाठी कटिबद्ध

पालघरमधील चिकू उत्पादक, आंबा उत्पादक, केळी उत्पादक, मिरची उत्पादक यांनी शासनाच्या चुकीमुळे पीक विमा उतरवण्यात न आल्याने त्याचा मोठा फटका बागायतदारांना बसल्याचे सांगितले, तर प्रकल्पांसाठी जमिनी घेऊनही त्याचा मोबदला न देता वाऱयावर सोडल्याची पैफियत प्रकल्पग्रस्तांनी मांडली.

 

जिह्यातच रोजगाराच्या संधी

केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारे प्रश्न, राज्य सरकारच्या अखत्यारित येणारे प्रश्न आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारित येणारे प्रश्न अशी या समस्यांची नोंद केली जात होती आणि त्यावर मार्ग काढून हा प्रश्न कसा सोडवता येईल याची ब्लू प्रिंटच उद्धव ठाकरे मांडत होते. मोदी, शहांनी महाराष्ट्राचे लुटलेले वैभव परत आणणार असे सांगतानाच पालघर जिह्यातच नोकरीच्या संधी कशा निर्माण केल्या जातील याचा आराखडाच उद्धव ठाकरे यांनी मांडला. विस्तीर्ण समुद्रकिनाऱयामुळे मरीन पार्क, जव्हारला पर्यटन केंद्र, वसई, अर्नाळा यासारख्या किल्ल्यांचे वैभव जपून पर्यटकांना आकर्षित करण्याची योजना, पालघरमध्ये वाढवण आणि मुरबे पोर्टऐवजी जागा उपलब्ध करून एअरपोर्ट उभारता येईल का यासाठी सगळय़ा पातळय़ांवर पाठपुरावा करण्याची ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली. हे प्रश्न सोडवण्यासाठी  केवळ आंदोलन न करता आपल्याला हक्काचा खासदार निवडून आणावा लागेल. त्यासाठी भारती कामडी यांना लोकसभेत पाठवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;