Jalna Crime : कामावर येण्यास नकार दिल्याने हॉटेल मालकानं महिलेला केलं ठार, चाकूहल्ल्यात मुलासह दोघे जखमी

Jalna Crime : कामावर येण्यास नकार दिल्याने हॉटेल मालकानं महिलेला केलं ठार, चाकूहल्ल्यात मुलासह दोघे जखमी

कामावर येण्यास नकार दिल्याने हॉटेल मालकाने चाकूने भोसकून महिलेचा खून केला. जालन्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून सुभद्रा अर्जुन वैद्य (वय – 40) असे मृत महिलेचे, तर गणेश ज्ञानदेव कातकडे (वय – 45) असे आरोपी हॉटेल मालकाचे नाव आहे. त्याने केलेल्या चाकूहल्ल्यात महिलेच्या मुलासह अन्य दोघे जखमी झाले आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.0

मिळालेल्या माहितीनुसार, सुभद्रा वैद्य या रामनगर साखर कारखाना परिसरातील मथुरा हॉटेवरल गेल्या 8 वर्षांपासून भांडीकुंडी धुण्याचे काम करत होती. मात्र मुलांच्या आग्रहाखातर त्यांनी हॉटेलमध्ये काम करणे बंद केले. मात्र तिने कामावर यावे यासाठी हॉटेल मालक गणेश कातकडे तिच्यावर दबाव टाकत होता आणि दारु पिऊन तिच्या घरी जाऊन धिंगाणाही घालत होता.

शुक्रवारी रात्री साडे बाराच्या सुमारास तो दारु पिऊन सुभद्रा वैद्य यांच्या घरी गेला आणि कामावर येण्यासाठी वाद घालू लागला. मात्र शेजाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर तो तिथून निघून गेला. त्यानंतर मध्यरात्री 2 वाजता तो पुन्हा सुभद्रा यांच्या घरी आला आणि दरवाजा उघडताच त्याने समोर दिसेल त्याच्यावर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. पोटात चाकू भोसकल्याने सुभद्रा यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, आईच्या आरडाओरड्याने जाग आलेला मुलगा सचिन वैद्य (वय – 20) याच्यावरही आरोपीने हल्ला केला. तसेच मध्यस्थीसाठी धावलेल्या शेजारील अभिषेक याच्यावरही वार केले. या हल्ल्यानंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी गणेश कातकडे याला पोलिसांनी मंठा चोफुली भागातून अटक केली.

परतूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत यांच्यासह मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. मयत महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात हलविण्यात आला आहे. दोन्हीही जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;