इस्रायलमधून 5 हिंदुस्थानींची सुटका

इस्रायलमधून 5 हिंदुस्थानींची सुटका

 

इराणने एमएससी एरियज या कंटेनर जहाजातून पाच हिंदुस्थानी नागरिकांची सुटका केली, अशी माहिती हिंदुस्थानी दूतावासाने दिली. सुटका करण्यात आल्यानंतर हे पाचही जण हिंदुस्थानकडे रवाना झाले. 18 एप्रिल रोजी महिला कॅडेट ऍन टेसा जोसेफची सुटका करण्यात आली होती. मात्र अजूनही 11 हिंदुस्थानी क्रू इराणमध्ये कैद आहेत. इराणने दाखवलेल्या सहकार्याबद्दल इराणमधील हिंदुस्थानी दूतावासाने इराणच्या अधिकाऱयांचे आभार मानले आहेत. इस्रायलवर हल्ला करण्यापूर्वी इराणने ओमानच्या आखातातील होर्मुझ खिंडीतून हिंदुस्थानात येणारे पोर्तुगीज ध्वज असलेले जहाज ताब्यात घेतले होते. 13 एप्रिल रोजी ही माहिती देण्यात आली. त्यात 25 क्रू मेंबर्स उपस्थित होते, त्यात 17 हिंदुस्थानी आणि दोन पाकिस्तानी नागरिक होते. सरकार जहाजावरील उर्वरित 16 हिंदुस्थानी नागरिकांच्या संपर्कात आहे. सर्व क्रू मेंबर्स निरोगी असून ते हिंदुस्थानातील त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत. त्यांच्या सुटेकसाठी बोलणी सुरू आहे, असे हिंदुस्थान परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;