चौथ्या टप्प्याचा निवडणूक प्रचार संपला; महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांसह देशातील 96 जागांसाठी उद्या मतदान
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि एक पेंद्रशासित प्रदेशातील 96 मतदारसंघात सोमवारी मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे, नगर, शिरूर, शिर्डीसह 11 मतदारसंघांचा समावेश आहे. चौथ्या टप्प्यात अनेक मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळत असून, राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने जनतेचा काwल आहे.
निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. दुसऱया टप्प्यात 26 एप्रिल, 6 मे रोजी 11 मतदारसंघात मतदान झाले. चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी 11 मतदारसंघात सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान होणार आहे.
लक्षवेधी लढती
– पुणे ः महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्यात लढत आहे.
– शिरूर ः महाविकास आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे आणि महायुतीचे मिंधे गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यात लढत आहे. विद्यमान खासदार असलेले डॉ. कोल्हे यांचे पारडे येथे जड आहे.
– मावळ ः महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संजोग वाघेरे-पाटील आणि महायुतीचे मिंधे गटाचे श्रीरंग बारणे अशी लढत आहे. वाघेरे-पाटील यांना जनतेचा मोठा पाठिंबा आहे.
– शिर्डी ः महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भाऊसाहेब वाकचौरे आणि महायुतीचे मिंधे गटाचे सदाशिव लोखंडे यांच्यात लढत आहे. वाकचौरे यांच्या बाजूने जनतेचा काwल आहे.
– छत्रपती संभाजीनगर ः महाविकास आघाडीचे उमेदवार, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, एमआयएमचे इम्तियाज जलील आणि महायुतीचे मिंधे गटाचे संदीपान भुमरे हे प्रमुख तीन उमेदवार आहेत. खैरे यांना जनतेचा मोठा पाठिंबा आहे.
– बीड ः भाजप उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्यात चुरशीची लढत आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे.
– जालना ः भाजपचे पेंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि महाविकास आघाडीचे डॉ. कल्याण काळे यांच्यात लढत आहे.
– जळगाव ः महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे करण पाटील आणि भाजपच्या स्मिता वाघ यांच्यात लढत आहे. करण पाटील यांचे पारडे जड आहे.
– रावेर ः भाजपच्या रक्षा खडसे आणि महाविकास आघाडीचे श्रीराम पाटील यांच्यात लढत आहे.
– नंदुरबार ः महाविकास आघाडीचे गोपाल पाडवी आणि भाजपच्या डॉ. हिना गावित यांच्यात लढत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List