सुसंस्कृत महाराष्ट्रात दमदाटी चालणार नाही, आम्ही खपवून घेणार नाही; सुप्रिया सुळेंनी सुनावले

सुसंस्कृत महाराष्ट्रात दमदाटी चालणार नाही, आम्ही खपवून घेणार नाही; सुप्रिया सुळेंनी सुनावले

नगरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्याविरोधात अजित पवारांनी आघाडी उघडली आहे. पारनेर येथील सभेत अजित पवार यांनी निलेश लंके यांना दमदाटी करत थेट इशारा दिला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही थेट अजित पवारांना प्रत्युत्तर देत चांगलेच सुनावले आहे. तसेच सुसंस्कृत महाराष्ट्रात दमदाटी चालणार नाही, आम्ही ती खपवून घेणार नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

अजित पवार यांनी निलेश लंके यांना पारनेर येथील सभेत इशारा दिला आहे. अरे निलेश बेटा, तू ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा हेडमास्तर मी आहे. तू माझ्या नादी लागू नको, महाराष्ट्रात जे जे माझ्या नादी लागले, त्याचा पुरता बंदोबस्त मी केलाय. तू किस झाड की पत्ती है? तू काय समजतोस स्वत:ला? अशी दमदाटी करत अजित पवारांनी निलेशं लंके यांना इशारा दिला. त्याला सुप्रिया सुळे यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.

सुप्रिया सुळेंनी कोणाचेही नाव न घेता अजित पवारांना चांगलेच सुनावले आहे. दमदाटीचे राहू द्या. कोण घाबरत नाही त्याला. त्यांच्या सभेत त्यांचे भाषण सुरू असतानाच ‘राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी’ असे जमावाने सांगितले. त्यांनी दमदाटी केली तर ती सुसंस्कृत महाराष्ट्रात चालणार नाही. आम्ही ती खपवून घेणार नाही. निलेश लंकेला जे दमदाटी करतात त्यांना मला विनम्रपणे सांगायचे आहे की, दमदाटी तुमच्या घरात चालवा, बाहेर नका चालवू, असे त्यांनी सुनावले. तसेच यांना कशाला घाबरता? हे ज्यांना घाबरतात, त्यांच्यासमोर डंके की चोटपर मी आणि अमोल कोल्हे दिल्लीत भाषणं करतो, असा टोलाही त्यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;