तुम्ही मला बोलावले नाही, मी इथे आलोय कारण…; राहुल गांधी यांनी सांगितला ईडी चौकशीचा किस्सा

तुम्ही मला बोलावले नाही, मी इथे आलोय कारण…; राहुल गांधी यांनी सांगितला ईडी चौकशीचा किस्सा

उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एका सभेत राहुल गांधी यांनी त्यांच्या सीबीआय आणि ईडी चौकशीबाबतचा अनुभव सांगितला. सीबीआय आणि ईडीने माझी 55 तास चौकशी केली. त्यावेळी आपण ईडी अधिकाऱ्यांना सांगितले की, तुम्ही मला बोलावले आहे, या भ्रमात राहू नका, तुम्ही मला बोलावले नाही, मी इथे आलोय कारण मला बघायचे आहे की, देशातील लोकशाहीचा गळा कोण घोटत आहे. त्यासाठी मी स्वतःहून येथे आलो आहे, असे आपण अधिकाऱ्यांना सांगितले, असेही राहुल गांधी म्हणाले.

चौकशीच्या वेळी मला लॉकअप दिसत होते. माझ्या मनात विचार आला की, माझे पणजोबा पंडित नेहरू अशाच लॉकअपमध्ये 12 वर्षे होते.मला 10 वर्षे तरी तेथील अनुभव मिळाला पाहिजे. मला त्यांनी कोणत्याही लॉतअपमध्ये पाठवू द्या, मला काहीही फरक पडणार नाही. मला देशातील जनतेसमोर सत्य मांडायचे आहे. आम्ही सत्य जनतेसमोर ठेवले तर देशातील राजकारण पूर्णपणे बदलेल, असा दावाही राहुल गांधी यांनी केला.

जून 2022 मध्ये राहुल गांधी यांची नॅशनल हेरॉल्डप्रकरणी काही दिवस ईडी आणि सीबीआयने चौकशी केली होती. त्यावेळचा अनुभव सांगत राहुल गांधी यांनी देशातील जनतेसमोर सत्य यायला हवे, असे म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;