महिलांना स्विटी किंवा बेबी म्हणणे लैंगिक टिप्पणी नाही! कोलकाता उच्च न्यायालयाचा निर्वाळा

महिलांना स्विटी किंवा बेबी म्हणणे लैंगिक टिप्पणी नाही! कोलकाता उच्च न्यायालयाचा निर्वाळा

महिलांना स्विटी किंवा बेबी असे म्हणणे ही लैंगिक टिपणी नाही, असा निर्वाळा कोलकाता उच्च न्यायालयाने एका खटल्याची सुनावणी करताना दिला. महिलांना दिलेले हे संबोधन काही सामाजिक वर्तुळात प्रचलित आहे. तसेच या शब्दांचा वापर केल्याने नेहमीच एखाद्याची लैंगिक इच्छा प्रकट होत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले. कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सब्यसाची भट्टाचार्य यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ, प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींचा गैरवापर केल्यास महिलांसाठी आणखी अडथळे निर्माण होऊ शकतात, असेही न्यायमूर्तींनी स्पष्ट केले. या प्रकरणात एका महिलेने आरोप केला होता की, कोस्ट गार्डमध्ये काम करत असताना कामाच्या ठिकाणी तिच्या वरिष्ठ अधिकाऱयाने स्विटी आणि बेबी असे शब्द वापरले गेले.

l वरिष्ठ अधिकाऱयाला धडा शिकवण्यासाठी महिलेने थेट कोर्टात याचिका दाखल केली होती. परंतु अशा शब्दांचा वापर अंतर्गत तक्रार समितीने अयोग्य मानले होते. या शब्दांचा लैंगिक आकांक्षेशी संबंध जोडण्याची गरज नाही, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

l हगिंग द कोस्ट हा वाक्यप्रचार लैंगिक रीतीने वापरल्याचा आरोपसुद्धा उच्च न्यायालयाने मान्य केला नाही. तटरक्षक दलामध्ये असे शब्द सर्रास वापरले जातात, असे सांगत न्यायालयाने तक्रारदाराची रिट याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. वरिष्ठ अधिकाऱयाविरुद्ध दाखल केलेल्या आणि प्रलंबित असलेल्या फौजदारी खटल्यावर उच्च न्यायालयाने कोणतेही भाष्य केले नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;