स्वयंपाकघर- वंदन तुज काकी!
>> तुषार प्रीती देशमुख
जिने तिच्या हक्काच्या स्वयंपाकघरात मला लुडबुड करायला दिली नसती तर आज मी शेफ म्हणून नावारूपाला आलोच नसतो त्या माझ्या काकीला समर्पित असा आजचा लेख.
माझा मित्र योगेशबरोबर जेव्हा त्याच्या घरी पहिल्यांदा गेलो तेव्हा त्याच्या आईने छान खिमा पॅटिस बनवले होते. घरात नुसता घमघमाट सुटला होता. त्यांनी प्रेमाने माझ्यासाठी चार खिमा पॅटिस मस्त सजवलेल्या एका प्लेटमध्ये सादर केले. योगेशचे दोन पॅटिस खाऊन संपले. त्याच्या काकांनी व वडिलांनीदेखील पॅटिस फस्त केले. मित्राच्या आईचं माझ्या प्लेटकडे लक्ष गेलं व त्यांनी विचारलं, “काय रे खाल्लं नाहीस अजून?” तेव्हा म्हटलं, “मी नॉनव्हेज खात नाही.” तेव्हा त्यांनी ती भरलेली प्लेट क्षणात स्वयंपाकघरात नेली व म्हणाल्या, “आलेच…” काही वेळातच त्यांनी दुसरी एक प्लेट माझ्या समोर आणून ठेवली आणि म्हणाल्या, “हे तुझ्यासाठी व्हेज स्पेशल!” आजही त्या खमंग, खुसखुशीत, चविष्ट ‘कोबीचं भानवलं’ची चव माझ्या जिभेवर रेंगाळते आहे.
त्यानंतर दोन वर्षांनी काही कारणास्तव जेव्हा मला माझं घर कायमचं सोडावं लागलं तेव्हा काकींनी व माझ्या मित्राने त्यांच्या घरी मला आधार दिला. काकी रोजचा घरी स्वयंपाक करत असताना त्यांच्या स्वयंपाकघरात जाऊन त्या काय बनवतायत किंवा त्यात थोडासा बदल करून पदार्थ आणखी वेगळा आणि रुचकर होऊ शकेल याबद्दल आमची चर्चा वाढू लागली. काकींनी एकंदरीतच माझा स्वयंपाकघरातला वावर व पदार्थ बनवण्याची आवड पाहून माझ्या नकळत त्यांच्या हक्काच्या स्वयंपाकघरात वावरायला परवानगी दिली. कौटुंबिक कार्पाम असो वा आम्हा मित्रांचं गेट-टुöगेदर, संपूर्ण स्वयंपाकाची जबाबदारी काकी व मी आनंदाने स्वीकारून सगळ्यांना प्रेमाने खाऊ घालायचो. काकी अनेक पदार्थ बनवायला मला शिकवू लागल्या. त्यांची समजावून शिकवण्याची पद्धत खूप सोपी होती. आईकडून शिकलेला भाजक्या पोह्याचा चिवडा जेव्हा मी त्यांना प्रथम करून खाऊ घातला तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून वाहिलेले आनंदाश्रू आजही आठवतात.
झी मराठी टीव्हीवरील माझे पहिले पदार्पण ‘आम्ही सारे खवय्ये’ या कार्पामातून झाले. ‘सहकुटुंब सहपरिवार’ या सत्रात काकींबरोबरच्या त्यांनी मला शिकवलेल्या एका पदार्थाच्या सादरीकरणातून झाले. त्यानंतर अनेक रेसिपी शोज केले. काकींच्या मदतीमुळे रेसिपी शोमधील पदार्थांच्या सादरीकरणासाठी लागणारी सर्व पूर्वतयारी काकी मला करून द्यायच्या आणि मी फक्त ते सादर करून टीव्हीवर झळकायचो. त्यामुळे माझ्या पाठीवर खरंच आईरूपी आणि स्वामीकृपेने लाभलेल्या माझ्या काकींची मेहनत आहे. एका दिवसाला पाच पदार्थांचे शूटिंग असायचे. त्यामुळे त्या सर्व पदार्थांची पूर्वतयारी आम्ही दोघं प्रत्येक रेसिपी लिहून त्यासाठी लागणारे मसाले, भाज्या, सुकी-ओली मसाल्यांची तयारी… सगळे जिन्नस वेगवेगळे पाच बॅगांमध्ये भरून काकी मला सुपूर्द करायच्या. त्यानंतर घरापासून ते स्टुडिओपर्यंत आणि स्टुडिओपासून पुन्हा घरापर्यंतचा प्रवास यात मला मोलाची साथ लाभली ती प्रीती बटा, अंकिता केळकर व माझा मदतनीस शेफ अतिश मानवे यांची. आई-आजीकडून सीकेपी, पुण्यातील राजहंस आजीकडून ब्राह्मणी व काकींकडून पाचकळशी पदार्थांची शिकवणी लाभली.
आईचा पदर पकडून स्वयंपाकाचे जे धडे तिच्याकडून गिरवे ते सर्व काकींनी त्यांच्या स्वयंपाकघरात लुडबुड करायला दिल्यामुळे अजून ाज्जतदार ठरो. तुम्हाला वाटत असेल की, मी घरी रोजचा स्वयंपाक करून सगळ्यांना खाऊ घालतो, तर तसं अजिबात नाही बरं का! सगळे पदार्थ काकी आमच्यासाठी बनवत असतात. अनेकदा संकट काळात आम्ही दोघांनी घरगुती पदार्थ पीचा व्यवसाय करून घरातील आर्थिक जबाबदारीदेखील सांभाळली. मी काकींकडून उत्तम कळीदार उकडीचे मोदक करायला शिकलो. त्यानंतर मोदक बनवण्याचे प्रशिक्षण वर्गदेखील घेतले. मी तुम्हाला सेलिब्रिटी शेफ होण्यामागची खरी मेहनत काकींची आहे.
या संपूर्ण प्रवासात साथ लाभली ती सेटवरील बॅक किचन मदतनीस ताई व दादांची, कॅमेरामॅन दादा, एडिटर, डायरेक्टर, या संपूर्ण प्रोसेसशी निगडित असलेल्या प्रत्येक व्यक्तीची व तुमच्यासारख्या दर्दी प्रेक्षक खवय्यांची. मी नावारूपाला येण्यामध्ये माझा मित्र योगेश म्हात्रे व त्याची आई म्हणजे माझ्या काकी नीना दिलीप म्हात्रे यांची मोलाची साथ आहे. त्यांच्याशिवाय आज मी तुमच्यासमोर सेलिब्रिटी शेफ म्हणून येऊ शको नसतो. अशा माझ्या ‘आईरूपी काकींना’ साष्टांग दंडवत!
[email protected]
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List