टाकवे तलावाला गळती; पाणीसाठा खालावला, प्रशासनाचे दुर्लक्ष; शेतकऱयांकडून संताप

टाकवे तलावाला गळती; पाणीसाठा खालावला, प्रशासनाचे दुर्लक्ष; शेतकऱयांकडून संताप

एकीकडे उन्हाची तीक्रता दिवसागणिक वाढत असताना दररोज पाण्याची पातळी झपाटय़ाने खालावत आहे. अजून उन्हाळी पावसाचा पत्ता नाही. लांबलेला पाऊस आणि कडक उन्हाळ्यामुळे शेतीसाठी वाढलेला पाणीवापर व वेगाने होणारे बाष्पीभवन यामुळे तलावातील पाणीपातळी खालावत आहे. शिराळा तालुल्यातील टाकवे तलावातील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त घटलेला दिसत आहे. त्यातच जॅकवेलमध्ये दगड अडकल्याने तलावाला गळती लागली असून, मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असून, शेतकऱयांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

टाकवे तलावाची गळती काढण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे शेतकऱयांनी अनेक वेळा निवेदन दिले आहेत. मात्र, अधिकारी याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. गळतीमुळे प्रत्येक वर्षी तलाव कार्यक्षेत्रातील गावांना शेतीसह पिण्याच्या पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तलावाची गळती थांबली, तर शेतकऱयांचा पाणीप्रश्न सुटणार आहे. मात्र, अधिकारी निक्रिय असल्यामुळे शेतकऱयांमधून संताप व्यक्त होत आहे. टाकवे तलावातील कार्यक्षेत्रात सहा गावांतील सिंचनक्षेत्रदेखील जास्त आहे. प्रत्येक वर्षी पाण्याच्या वापरापेक्षा पाणी वाया जाण्याचे प्रमाण जास्त आहे. यासाठी चालू उन्हाळ्यात लीकेज काढून पाणीटंचाई थांबवावी, अशी मागणी होत आहे.

अतिवृष्टीच्या भागात पाटबंधारे विभागाच्या गलथानपणामुळे पाणीटंचाईचा सामना शेतकऱयांना करावा लागत आहे. या तलावावर अवलंबून असणाऱया सिंचन योजनांना घरघर लागली आहे. शेतीच्या पाण्याचे नियोजन येत्या काही दिवसांत धोक्यात येऊन ऊस उत्पन्नात घट होऊन शेतकऱयांचे आर्थिक नियोजन कोलमडणार आहे.

– टाकवे तलावातील पाणीसाठा मृत संचयाकडे, तर दुसऱया फोटोत जॅकवेलमधून होणारी पाणीगळती. (छाया ः गोरख पवार)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;