मालदीवमधील सैनिक परतले!
हिंदुस्थान आणि मालदीव या दोन देशांमधील संबंध पार विकोपाला गेले आहेत. मालदीवने सर्व हिंदुस्थानी सैनिकांना मालदीवमधून बाहेर काढले आहे. हे सर्व सैनिक आता हिंदुस्थानात परतले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी ही माहिती दिली. मालदीवमधील आमचे सर्व सैनिक हिंदुस्थानात परतले आहेत. आम्ही या मुद्दय़ावर मालदीवशी बरेच दिवस बोलत आहोत, असेही ते या वेळी म्हणाले. मालदीवचे परराष्ट्रमंत्री मुसा जमीर एक दिवसीय हिंदुस्थानच्या दौऱयावर असताना ही घोषणा करण्यात आली. जी जबाबदारी हिंदुस्थानी जवानांवर होती ती आता तेथील नागरिक पार पाडतील. हिंदुस्थान, मालदीव आणि श्रीलंकेचे सैन्य एकत्रितपणे सराव करतात. आम्ही हे चालूच ठेवू, असेही ते म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List