संविधान की संसद, कोण सर्वोच्च? सरन्यायाधीश गवई यांनी सांगितलं…

संविधान की संसद, कोण सर्वोच्च? सरन्यायाधीश गवई यांनी सांगितलं…

देशाचे मुख्य न्यायमूर्ती (CJI) भूषण गवई यांनी बुधवारी अमरावती येथील एका कार्यक्रमात संविधान आणि संसदेच्या सर्वोच्चतेवर सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत स्पष्ट मत मांडलं. ते म्हणाले आहेत की, “हिंदुस्थानात संसद नाही तर, संविधान सर्वोच्च आहे.” अमरावती येथे बार असोसिएशनने आयोजित केलेला पुरस्कार वितरण समारंभात बोलताना ते असं म्हणाले आहेत.

वृत्तसंस्था पीटीआयनुसार, सरन्यायाधीश गवई यांनी आपल्या भाषणात सांगितले की, कार्यकारी, कायदेमंडळ की न्यायपालिका, लोकशाहीचे कोणते अंग सर्वोच्च आहे, यावर नेहमीच वादविवाद होत असतात. काही लोकांचे म्हणणे आहे की, संसद सर्वोच्च आहे. परंतु माझ्या मते हिंदुस्थानचे संविधान सर्वोच्च आहे. लोकशाहीचे तिन्ही अंग संविधानाच्या अंतर्गत काम करतात.”

सरन्यायाधीश गवई म्हणाले की, न्यायाधीशांनी नेहमीच लक्षात ठेवावे की, नागरिकांच्या हक्कांचं, संवैधानिक मूल्यांचं आणि तत्त्वांचं रक्षक असणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्याकडं केवळ शक्ती नाही तर, काही जबाबदाऱ्या देखील आहेत.” ते पुढे म्हणाले की, “न्यायाधीशांनी त्यांच्या निर्णयाबद्दल लोक काय म्हणतील किंवा त्यांना काय वाटेल, यावर अवलंबून राहू नये. त्याऐवजी आपण स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे. लोक काय म्हणतील ते आपल्या निर्णय प्रक्रियेचा भाग बनू शकत नाही.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;