भावी जावई, अधिकाऱ्याची पात्रता शोधण्यासाठी आरटीआयचा वापर! कायद्याच्या दुरुपयोगाबाबत कोर्टाची नाराजी

भावी जावई, अधिकाऱ्याची पात्रता शोधण्यासाठी आरटीआयचा वापर! कायद्याच्या दुरुपयोगाबाबत कोर्टाची नाराजी

कायदे फायदेशीर उद्देशाने तयार केले जातात, मात्र हा विरोधाभास आहे. होणारा भावी जावई, तरुण सरकारी अधिकारी त्याची पात्रता अशी अनावश्यक माहिती गोळा करण्यासाठी आजकाल आरटीआय कायद्याचा दुरुपयोग केला जातोय, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने माहिती अधिकाराच्या गैरवापराबद्दल नाराजी व्यक्त केली.

राज्य माहिती आयोगाच्या आयुक्त पदांसह अन्य काही पदे रिक्त असल्याचा दावा करत माजी मुख्य माहिती आयुक्त शैलेश गांधी व काही माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. रिक्त पदांमुळे आरटीआय संबंधित अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. ही पदे लवकरात लवकर भरूण प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे व न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी सरकारच्या वतीने वकील ज्योती चव्हाण यांनी मुख्य माहिती आयुक्त व सात विभागीय माहिती आयुक्त कार्यालयात एकही पद रिक्त नसल्याचे सांगितले. खंडपीठाने याची दखल घेत माहिती अधिकार कायदा – 2005 अंतर्गत दुसऱया अपीलांचा जलदगतीने निपटारा करण्यास सांगितले.

किती समोसे दिले
सुनावणीला माहिती अधिकार आयोगाच्या वकिलाने काही कार्यालयांमध्ये किती समोसे दिले गेले यासारखे काही फालतू अर्ज दाखल केले गेल्याची माहिती खंडपीठाला देण्यात आली तसेच प्राधिकरणासमोर एकूण प्रलंबित प्रकरणे फक्त 5 टक्के होती, असे खंडपीठाला सांगण्यात आले. त्यावर माहिती अधिकाराचा (आरटीआय) गैरवापर होत असल्याचे हायकोर्टाच्या निदर्शनास आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;