मॅट्रिमोनी साईटद्वारे महिलेची 3.6 कोटी रुपयांची फसवणूक, पुणे पोलिसांनी मुंबई विमानतळावरून आवळल्या आरोपीच्या मुसक्या

मॅट्रिमोनी साईटद्वारे महिलेची 3.6 कोटी रुपयांची फसवणूक, पुणे पोलिसांनी मुंबई विमानतळावरून आवळल्या आरोपीच्या मुसक्या

मॅट्रिमोनी साईटवर ऑस्ट्रेलियन डॉक्टर असल्याचे भासवत महिलेची 3.6 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला मुंबई विमानतळावर बेड्या ठोकण्यात आल्या. अभिषेक शुक्ला असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो लखनऊचा रहिवासी आहे आणि सध्या ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे राहत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मॅट्रिमोनी साईटवर स्वतःचे बनावट प्रोफाईल बनवले होते. त्याने मॅट्रिमोनी साईटवर स्वतःची ओळख ऑस्ट्रेलियात प्रॅक्टिस करणारा डॉक्टर रोहित ओबेरॉय अशी करून दिली. मॅट्रिमोनी साईटद्वारे आरोपीने 2023 मध्ये पुण्यातील खराडी भागात राहणाऱ्या एका महिलेशी संपर्क साधला. यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. महिलेला तिच्या पहिल्या घटस्फोटातून 5 कोटी रुपयांची पोटगी मिळाली होती. पीडित महिला शाळांमध्ये माइंडफुलनेस आणि अध्यात्मावर कार्यशाळा घेत असे.

महिलेच्या आर्थिक परिस्थितीची माहिती घेत आरोपीने तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय वाढवण्याचे स्वप्न दाखवले. यानंतर सिंगापूरमध्ये राहणाऱ्या त्याच्या दोन साथीदारांच्या नावाने अनेक खात्यांमध्ये एकूण 3.6 कोटी रुपये ट्रान्सफर केले. पैसे लुबाडल्यानंतर आरोपीने आपल्याला कर्करोग झाल्याचे सांगत महिलेपासून दूर राहू लागला. यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये महिलेला एक मेल प्राप्त झाला. यात डॉ. ओबेरॉय यांचं निधन झाल्याचे सांगण्यात आले.

महिलेला संशय आल्याने तिने सायबर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तांत्रिक तपास असता आरोपीचे खरे नाव अभिषेक शुक्ला असल्याचे कळले. पोलिसांनी आरोपीविरोधात लूकआउट नोटीस जारी केली. यानंतर 25 जून 2025 रोजी आरोपीला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. आरोपीने आतापर्यंत 3,194 महिलांची फसवणूक करत केल्याचे तपासात समोर आलं आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सानिका वाकसे, जीवन जाधवकडे नेतृत्व, युवा राष्ट्रीय कबड्डीसाठी महाराष्ट्र संघ जाहीर सानिका वाकसे, जीवन जाधवकडे नेतृत्व, युवा राष्ट्रीय कबड्डीसाठी महाराष्ट्र संघ जाहीर
हरिद्वार येथे 28 जून ते 1 जुलैदरम्यान होणाऱ्या पहिल्या युवा (18 वर्षांखालील) मुले व मुली यांच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राने...
कश्मीरमध्ये चकमक; दहशतवाद्याचा खात्मा
सुनीता शिरोडकर यांचे निधन
Jabbar Patel – ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना शाहू पुरस्कार प्रदान
पुणे बाजार समिती टेंडरसाठी आजी – माजी खासदारांचे मोहोळ, मर्जीतल्या ठेकेदारांसाठी नियम बदलले
समृद्धीमुळे भ्रष्टनाथ शिंदेंची समृद्धी झाली पण रस्ता खड्ड्यात गेला, आदित्य ठाकरे यांची टीका
आवडीने नारळपाणी पिताय? थांबा, शरीराचे होऊ शकते मोठे नुकसान!