वारीच्या वाटेवर प्रथमच जर्मन हँगर मंडप, पावसामुळे वारकऱ्यांची होणारी गैरसोय टळणार

वारीच्या वाटेवर प्रथमच जर्मन हँगर मंडप, पावसामुळे वारकऱ्यांची होणारी गैरसोय टळणार

पंढरीची वारी आणि पालखी सोहळ्यामध्ये पावसामुळे वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून यंदा पहिल्यांदाच पालखी मार्गावर 12 ठिकाणी जर्मन हँगर मंडप उभारण्यात येणार आहेत. पाऊस आला तरी मुक्कामाच्या ठिकाणी वारकरी पाऊसपाण्यापासून सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी जिल्हा परिषदेमार्फत पालखी सोहळ्यासाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अप्पासाहेब गुजर उपस्थित होते.

यंदा पाऊसमान जास्तीचे सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेकडून पालखी मार्गावर सोयी-सुविधांची तयारी करण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती देताना गजानन पाटील म्हणाले, ‘पालखी मार्गावर मुक्कामांच्या ठिकाणी आवश्यक सुविधांचे नियोजन केले आहे. ग्रामपंचायतींना स्वच्छता आणि आरोग्यासाठी देण्यात येणाऱ्या निधीमध्ये वाढ केली आहे. तीन लाखांवरून आता पाच लाख रुपये केली आहे. तर, दुपारच्या विसाव्यासाठी दोन लाख आणि लहान विसाव्यासाठी ग्रामपंचायतींना एक लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे.

शासनाकडे 25 कोटी 84 लाख रुपयांच्या निधीची मागणी केली होती. त्यापैकी जवळपास 70 टक्के निधी शासनाने दिला आहे. त्याचे ग्रामपंचायतींना वितरण आजच सुरू होईल. जिल्हा परिषदेकडून दिंडीप्रमुखांना तीन हजार औषधांचे किटवाटप करण्यात येईल, ज्यामध्ये 13 प्रकारची औषधे आणि ती वापरण्यासाठी माहितीपत्रक दिले जाणार आहे. सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर 250 कामगारांकडून साफसफाईचे काम हाती घेण्यात येईल. याशिवाय चार हजारपेक्षा जास्त फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे.

पालखी मार्गावरील सुविधा मुख पालखी आणि दिंडीसोबत 24 तास वैद्यकीय सेवा आणि डॉक्टर्स

हिरकणी कक्ष – 58
पिण्याच्या पाण्याचे टँकर – 200
टँकर भरणा केंद्रे – 98
आरोग्य केंद्र, उपकेंद्र, खासगी रुग्णालयांत – 10
टक्के आयसीयू बेड्स राखीव रुग्णवाहिका – 171
पाण्याचे स्रोत तपासणीसाठी – 1335

फिरत्या शौचालयांबरोबरच घरगुती शौचालयेदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

किती शौचालये असतील?

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा – 1800 (जाताना), 300 (येताना)
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा – 1200 (जाताना), 200 (येताना)
श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळा – 300 (जाताना), इतर पालखी सोहळे – 250
एकूण 4050 फिरती शौचालये असतील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Air India plane crash – ‘मी उडी मारली नाही, तर…’, विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव प्रवाशानं सांगितलं काय चमत्कार झाला Air India plane crash – ‘मी उडी मारली नाही, तर…’, विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव प्रवाशानं सांगितलं काय चमत्कार झाला
गुजरातच्या अहमदाबाद येथे गुरुवारी दुपारी एअर इंडियाचे AI171 हे प्रवासी विमान कोसळले. अपघातावेळी विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर...
Breaking- एअर इंडियाच्या विमानात बॉम्बची धमकी, थायलंडमध्ये आपत्कालीन लँडिंग
Air India Plane Crash- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी उड्डाण मंत्रालयाने याची जबाबादारी घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
Air India Plane Crash – हिंदुस्थानातील सर्वात भयंकर 10 विमान अपघात!
मुंबईहून लंडनला निघालेलं ‘एअर इंडिया’चं विमान अर्ध्यातून माघारी फिरलं; प्रवाशांची धाकधूक वाढली, नेमकं काय घडलं?
Air India Plane Crash – डोंबिवलीची ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर रोशनी सोनघरे मृत्यूमुखी
भाचीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी डॉक्टर पत्नीसोबत निघाले होते लंडनला, वाटेतच काळाने घातला घाला