पुणे बाजार समिती टेंडरसाठी आजी – माजी खासदारांचे मोहोळ, मर्जीतल्या ठेकेदारांसाठी नियम बदलले

पुणे बाजार समिती टेंडरसाठी आजी – माजी खासदारांचे मोहोळ, मर्जीतल्या ठेकेदारांसाठी नियम बदलले

पुणे बाजार समितीने नुकसानीत जाऊन कमी रकमेच्या वाहन तळाच्या ई निविदा राबवल्या आहेत. यासाठी नियम अटी पण मर्जीतल्या ठकेदारांच्या सोयीने ठेवल्या आहेत. मात्र, ट्रक पार्किंग येथील वाहनतळासाठी भाजपचे आजी – माजी खासदार मैदानात उतरले आहेत. हे टेंडर आपल्याच कार्यकर्त्याला मिळावे यासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे.

बाजार समितीने गुलटेकडी मार्केटयार्ड मुख्य प्रवेशद्वार समोरील स. नं 559 अ/2 ब/2 मधील सुमारे 1 हेक्टर 34 आर म्हणजे सुमारे तीन ते सव्वा तीन एकर जागेत रक्षक सिक्युरिटी सर्व्हिसेस अ‍ॅन्ड सिस्टिमस् प्रा.लि या ठेकेदाराल जुलै २०२० मध्ये बारा महिन्यांसाठी वाहनतळ ठेक्याचे काम दिले होते. या ठेक्याची मुदत संपल्यानंतरही सुमारे 4 वर्षे एक खासदाराच्या मेहरबानीने हे टेंडर रक्षककडे होते. मध्यंतरीच्या काळात मुदत संपली म्हणून या ना त्या कारणाने ठेकेदाराकडून टेंडर काढून घेण्याचे प्रयत्न केले गेले. मात्र, भाजपच्या माजी खासदाराच्या कृपेमुळे गेल्या दोन महिन्यांपर्यंत या ठेकेदाराची झोळी भरत राहिली होती. संचालक मंडळाच्या देवाण घेवाण बिनसल्याने आणि एका संचालकाच्या संघर्षामुळे अखेर दोन महिन्यांपूर्वी हा ठेका काढण्यात आला. त्यानंतर संचालक मंडळाच्या मर्जीतील माणसाला इ निविदा न राबविता ठेका दिला. मात्र कार्यकर्त्याचे टेंडर काढल्याने माजी खासदार यांनी माघार घेतली नाही. त्या माजी खासदाराने आपल्या पक्षातील नेते आणि बाजार समिती मधील काही भाजप संचालकांना हे टेंडर पुन्हा आपल्या कार्यकर्त्याला मिळवण्याची फर्मान काढले. त्यानुसार ई निविदा प्रक्रिया राबवून टेंडर देण्याचे ठरल्याने या वादावर पडदा पडला. बाजार समितीने ई निविदा प्रक्रिया राबवली. मात्र, ई निविदा उघडण्यापूर्वी या निविदेतील दुसर्‍या स्पर्धक ठेकेदारासाठी विद्यमान भाजपच्या खासदाराकडून प्रयत्न सुरू झाले. एका टेंडरसाठी विद्यमान आणि माजी खासदार यांच्याकडून विनंत्या सुरू झाल्याने बाजार समिती संचालक मंडळाने भीतीने या टेंडरला मुदतवढ दिली आहे. त्यामुळे भाजपच्या दोन्ही खासदाराच्या कार्यकर्त्यांचे जीव टांगणीला लागला आहे. दरम्यान याबाबत सभापती दिलीप काळभोर यांना खासदारांच्या दबावाबाबत विचारले असता त्यांनी टेंडर प्रकरणी कोणत्याही खासदाराचा दबाव अथवा फोन आला नसल्याचा दावा केला.

संचालक मंडळ अडचणीत सापडणार

संचालक मंडळाने अनेक टेंडर नियमबाह्य पद्धतीने देण्याचा सपाटा लावला आहे. ई निविदांसाठी तर नियम अटी ठेकेदारांकडून तयार केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ई निविदेत ठराविक लोकांना सहभागी होता येणार आहे. या कारभारामुळे संचालक मंडळ अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;