Hingoli News – चालकाचे नियंत्रण सुटले अन् कार टिप्परला धडकली, तिघांचा मृत्यू; पाच जण गंभीर जखमी

Hingoli News – चालकाचे नियंत्रण सुटले अन् कार टिप्परला धडकली, तिघांचा मृत्यू; पाच जण गंभीर जखमी

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन् कार थेट टिप्परवर धडकली. या अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला असून कारचाही चक्काचूर झाला. मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश आहे. अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात टोकाई टोकाई फाट्यावर ही घटना घडली.

कौटुंबिक कार्यक्रमाला जात असताना ही घटना घडली. कार चालकाला अंदाज न आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यानंतर कार थेट रस्त्यावर उभ्या असलेल्या टिप्परवर धडकली. यात कारचा चक्काचूर झाला.

अपघातात दोन बालकांचा जागीच मृत्यू झाला तर एका व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य पाच जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी नांदेडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;