Kolhapur News – आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे…; गीत गातच माजी शिक्षकाने घेतला शेवटचा श्वास,

Kolhapur News – आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे…; गीत गातच माजी शिक्षकाने घेतला शेवटचा श्वास,

माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनामध्ये गाणे गात असतानाच हृदयविकाराच्या धक्क्याने निवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात घडली. ‘आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे…’ असे गीत म्हणतच माजी शिक्षक विनायक सखाराम कुंभार (वय 78) यांनी शेवटचा श्वास घेतला. या घटनेनंतर विद्यार्थ्यांना सुद्धा मानसिक धक्का बसला. सर व्यासपीठावरून गाणं म्हणत असतानाच असा भयावह प्रसंग घडल्याने क्षणात कार्यक्रमात शोककळा पसरली.

विनायक सखाराम कुंभार (वय 78) असे मृत्यू झालेल्या निवृत्त शिक्षकाचे नाव आहे. शिरोळ तालुक्यातील उदगाव या ठिकाणी 2001-2002 च्या दहावीच्या बॅचने माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित केला होता. शंभरहून अधिक विद्यार्थी या मेळाव्याला उपस्थित होते. या विद्यार्थ्यांनी निवृत्त शिक्षकांना देखील कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. हा कार्यक्रम सुरू झाला आणि त्याचवेळी कुंभार सर भाषणाला उभे राहिले. मनोगत व्यक्त करत असताना त्यांनी गीत गाण्यास सुरुवात केली. “इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंद गडे”, हे गाणे म्हणत असताना कुंभार सरांना अचानक हृदयविकाराचा धक्का बसला. मनोगत व्यक्त करत असलेल्या ठिकाणीच कुंभार सर कोसळले. विद्यार्थ्यांनी उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याआधीच सरांचा मृत्यू झाला होता. या सगळ्या घटनेने माजी विद्यार्थ्यांना देखील मोठा धक्का बसला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;