मोदी सरकार देशाची दिशाभूल करतेय, CDS अनिल चौहान यांच्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक

मोदी सरकार देशाची दिशाभूल करतेय, CDS अनिल चौहान यांच्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक

हिंदुस्थानचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) अनिल चौहान यांनी सिंगापूर येथे ब्लूमबर्गशी बोलताना शनिवारी पहिल्यांदा पाकिस्तानच्या दाव्यावर भाष्य केले आहे. यानंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून केंद्रातील मोदी सरकार हे देशाची दिशाभूल करत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. केंद्र सरकारने तत्काळ विशेष अधिवेशन बोलवावे, अशी जोरदार मागणीसुद्धा खरगे यांनी केली आहे.

सिंगापूर दौऱ्यावर असलेल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी पहिल्यांदा ब्लूमबर्गला मुलाखत दिली. या मुलाखतीत पाकिस्तानने हिंदुस्थानी जेट पाडले का? असा सवाल ब्लूमबर्गने त्यांना विचारला होता. यावर बोलताना ते म्हणाले की, हा खरा मुद्दा नाहीय की किती विमाने पाडली. तर ती विमाने का पडली, हा खरा मुद्दा आहे. अनिल चौहान यांच्या या विधानानंतर काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्सवर एक पोस्ट केली असून, सीडीएसच्या मुलाखतीनंतर काही महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले आहेत. या सर्व प्रश्नांवर चर्चा त्याचवेळी शक्य आहे. ज्यावेळी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले जाईल. केंद्र सरकार देशातील जनतेची दिशाभूल करत आहे. आमचे हवाई दलाचे पायलट शत्रूशी लढताना आपला जीव धोक्यात घालत होते. आपल्याला काही नुकसान झाले आहे. परंतु, पायलट सुरक्षित आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध टाळले असेल तर ते शिमला कराराचे सरळसरळ उल्लंघन आहे, असा आरोपही खरगे यांनी केला आहे.

मोदी निवडणुकीत व्यस्त

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वारंवार हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील युद्ध टाळल्याचा दावा केला जात आहे. हा दावा खोटा आहे, असे सांगण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणुकीत व्यस्त आहेत. ते निवडणुकीत आमच्या सशस्त्र दलांच्या विजयाचे वैयक्तिक श्रेय घेत आहेत. जवानांच्या साहसांच्या मागे लपत आहेत. युद्धबंदी नेमकी कशामुळे झाली, हे सांगण्याऐवजी ते लोकांना भ्रमित करत आहेत. युद्धविराम नेमका कोणत्या अटींवर करण्यात आला आहे, हे जाणून घेण्याचा हक्क देशातील 140 कोटी लोकांना आहे, असे खरगे म्हणाले.

आमची विमाने पडली कशी? हे महत्त्वाचे! सीडीएस अनिल चौहान यांच्या विधानाने खळबळ

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;