फक्त प्रेम…! गिल आणि पंड्याने शेअर केली खास पोस्ट, एलिमिनेटर लढतीवेळी वाद झाल्याची होती चर्चा

फक्त प्रेम…! गिल आणि पंड्याने शेअर केली खास पोस्ट, एलिमिनेटर लढतीवेळी वाद झाल्याची होती चर्चा

इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामातील एलिमिनेटर सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन संघात पार पडला. या लढतीत मुंबईने विजय मिळवत क्वालिफायर टू मध्ये जागा मिळवली. मात्र या लढतीत मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या आणि गुजरातचा कर्णधार शुभमन गिल यांच्यात वादाचा भडका उडाल्याची चर्चा सुरू झाली.

गिलने नाणेफेकी वेळी हार्दिक पंड्या याच्याशी हस्तांदोलन केले नाही आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केले असा आरोप सोशल मीडियावर करण्यात आला. काहींनी असेही म्हटले की हार्दिकने गुजरात सोडून मुंबईमध्ये एन्ट्री केल्याने दोघांमध्ये वाद झाला. मात्र या सर्व चर्चांना एक खास पोस्ट शेअर करत दोघांनीही पूर्णविराम दिला आहे.

शुभमन गिल याने हार्दिकसोबतचा एक फोटो शेअर करत, “Nothing but love” (फक्त प्रेमच आहे) असे म्हटले. नंतर हार्दिक पंड्या याने देखील हीच पोस्ट शेअर केली आणि दोघांमध्ये कोणताही वाद नसल्याचे सांगितले. या दोन्ही पोस्ट्समुळे चाहत्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे. मैदानावरील द्वंद्व हे वैयक्तिक नसल्याचेच यामुळे स्पष्ट झाले

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;