स्वतःची स्तुती करणं थांबवा, ऑपरेशन सिंदूरवरील पंतप्रधान मोदींच्या भाषणांवर मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

स्वतःची स्तुती करणं थांबवा, ऑपरेशन सिंदूरवरील पंतप्रधान मोदींच्या भाषणांवर मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात केलेल्या भाषणांबाबत जोरदार टीका केली आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर सर्व नेत्यांनी संयम राखावा आणि एकजुटीने वागावे, असे आवाहन करत खर्गे यांनी केलं आहे. आपले सर्वपक्षीय शिष्टमंडळ परदेश दौऱ्यावर गेले आहे, त्यामुळे ते परत येईपर्यंत निवडणूक प्रचार करू नये. पंतप्रधान मोदींनी निवडणूक भाषणांमध्ये स्वतःची स्तुती करणारी विधाने करणे टाळावे. संपूर्ण देश सशस्त्र दलांच्या पाठीशी उभा आहे, असंही खर्गे म्हणाले. माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, “राष्ट्रीय बाबींवर एकता असावी आणि आपल्या विरोधकांना पराभूत करण्यावर लक्ष केंद्रित करावे. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर देशभरातील सर्व नेत्यांनी बोलताना संयम बाळगावे. याबाबत बोलण्यापूर्वी नेमके काय घडले याची माहिती घेणे आवश्यक आहे.”

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, “पंतप्रधानांनी यापूर्वी सांगितले होते की, त्यांनी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे, मग आता पुन्हा का बोलत आहेत? त्यांनी आत्मप्रशंसेची भाषणे करू नयेत. संपूर्ण देश आपल्या सशस्त्र दलांसोबत आहे.” त्यांनी सरकारवर देशाला दिशाभूल केल्याचा आरोपही केला आणि संसदेचे विशेष अधिवेशन बोलवून या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्याची मागणी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;