कोल्हारमध्ये जेरबंद झालेला बिबट्या पिंजरा तोडून पसार; परिसरात दहशतीचे वातावरण

कोल्हारमध्ये जेरबंद झालेला बिबट्या पिंजरा तोडून पसार; परिसरात दहशतीचे वातावरण

कोल्हार येथील निबेवस्तीनजीक एकाच ठिकाणी पाचवा बिबट्या जेरबंद झाल्याची घटना घडली. मात्र, शुक्रवारी रात्री पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या रात्रीत अवघ्या काही तासांत पिंजरा तोडून पसार झाल्याने खळबळ उडाली आहे. नगर-शिर्डी रस्त्यावरील कोल्हारजवळील निबेवस्तीनजीक ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत साठवण तलावाचे काम सुरू आहे. याच ठिकाणी गत दीड महिन्यात एकाच ठिकाणी वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एकापाठोपाठ सलग पाचवा बिबट्या जेरबंद झाल्याची घटना समोर आली. बहुधा राज्यातील ही पहिलीच घटना असावी.

शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास पाचवा बिबट्या जेरबंद झाला. त्याच्या डरकाळ्यांनी परिसरातील नागरिक पिंजऱ्याकडे धावले. पिंजऱ्यात बिबट्याला पाहून त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांचा हा आनंद बिबट्याने एका रात्रीत हिरावून घेत येथील नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविले. बिबट्याने काही तासांत पिंजऱ्याच्या खालील भागात लावलेले प्लायवूड उखडत पिंजऱ्यातून धूम ठोकली. बिबट्या पिंजरा तोडून पळाल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे.

सततच्या पावसाने प्लायवूड फुगले; वन विभागाचा दावा
सलग झालेल्या पावसाने पिंजऱ्याच्या खालील भागात लावलेले प्लायवूड फुगले आणि कमकुवत झाले. मुख्यत्वे बिबट्या हा मांजरासारखा प्राणी असल्याने त्याचे शरीरही आकुंचन पावते. त्यामुळे थोड्याशा जागेतूनही तो आपली सुटका करू शकतो. या घटनेतही पिंजऱ्याचे प्लायवूड पावसाने खराब झाले. बिबट्या शक्तिवान प्राणी असल्याने पायाखालील प्लायवूड तोडून त्याने पलायन केले असावे, असा दावा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

कोल्हार… बिबट्यांचे नंदनवन !
कोल्हारमध्येच अवघ्या काही दिवसांपूर्वी दोन बिबट्यांच्या झुंजीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना राजुरी रोडलगत घडली. त्यामुळे कोल्हार-भगवतीपूर गाव बिबट्याच्या सुरक्षित आश्रयाचे नंदनवन ठरते की काय? असा प्रश्न उपस्थित होत असून, बिबट्याच्या दहशतीने बळीराजा धास्तावला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;