दुर्गराज रायगडावर सापडले प्राचीन ‘यंत्रराज’ सौम्ययंत्र; खगोलशास्त्रीय अभ्यासाचा महत्त्वपूर्ण पुरावा

दुर्गराज रायगडावर सापडले प्राचीन ‘यंत्रराज’ सौम्ययंत्र; खगोलशास्त्रीय अभ्यासाचा महत्त्वपूर्ण पुरावा

दुर्गराज रायगडावर हिंदुस्थानी पुरातत्त्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खनन कार्यादरम्यान एक ऐतिहासिक खगोलशास्त्रीय उपकरण ‘यंत्रराज’ अर्थात सौम्ययंत्र (Astrolabe) सापडले आहे. या शोधामुळे रायगडाच्या बांधकामात तत्कालीन अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतींचा वापर झाल्याचा महत्त्वपूर्ण पुरावा हाती लागला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

‘यंत्रराज’ सौम्ययंत्र हे प्राचीन काळापासून ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास, दिशांचा वेध आणि वेळ मोजण्यासाठी वापरले जाणारे अत्यंत महत्त्वाचे उपकरण आहे. अक्षांश, रेखांश, कर्कवृत्त, विषुववृत्त यांसारख्या खगोलशास्त्रीय बाबींचा अभ्यास सुलभ व्हावा यासाठी या यंत्राचा उपयोग होत असे. रायगडाच्या बांधकामादरम्यान खगोलशास्त्रीय गणनांसाठी या यंत्राचा वापर झाला असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

गेल्या तीन ते चार वर्षांपासून रायगडावर रोपवे अप्पर स्टेशनच्या मागील भागापासून कुशावर्त तलाव, बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर आणि वाडेश्वर मंदिर परिसरातील शिवकालीन वाड्यांच्या अवशेषांवर उत्खननाचे कार्य सुरू आहे. यापैकी कुशावर्त तलावाच्या वरच्या भागात आणि पर्जन्यमापक ते वाडेश्वर मंदिरादरम्यानच्या ऐतिहासिक वाड्याच्या जागेवर हे सौम्ययंत्र सापडले आहे.

या यंत्रावर कोरलेली अक्षरे आणि कासव/सापासदृश प्राण्यांचे अंकन विशेष उल्लेखनीय आहे. यंत्राच्या वरच्या बाजूस ‘मुख’ आणि ‘पूंछ’ अशी अक्षरे कोरलेली असून, त्याद्वारे उत्तर आणि दक्षिण दिशांचा अंदाज बांधणे सोपे होत असावे, असे संशोधकांचे मत आहे.

हा शोध इतिहास आणि खगोलशास्त्राच्या अभ्यासकांसाठी अमूल्य ठेवा ठरला आहे. यामुळे रायगडाच्या बांधकामातील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तत्कालीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी नवीन संधी उपलब्ध झाली आहे. या यंत्राच्या पुढील संशोधनातून शिवकालीन स्थापत्यशास्त्र आणि खगोलशास्त्र यांचा अधिक सखोल अभ्यास होण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;