अनियंत्रित पिकअप जीप पुलावर आदळून उलटली, 5 जणांचा मृत्यू; एक गंभीर जखमी
भरधाव पिकअप जीप पुलाच्या रेलिंगवर आदळून उलटल्याने रविवारी सकाळी भीषण अपघात घडला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुलावरून उतरत असताना पिकअप जीपचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडला.
हिमाचल प्रदेशातील मंडी येथील आयआयटी कामंडजवळील पुलावर हा अपघात झाला. जखमीला उपचारासाठी मंडी झोनल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व जण पंजाबचे रहिवासी आहेत.
अपघातग्रस्त पिकअप जीप आयआयटी कामंडसाठी तंबूचे साहित्य घेऊन जात होती. या पिकअप जीपमध्ये चालकासह सहा जण होते. कामंड पुलाजवळ उतरत असताना पिकअप जीपचे ब्रेक निकामी झाल्यामुळे जीप पुलावर आदळली अन् अपघात घडला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List