स्पाच्या नावे वेश्याव्यवसाय, खराडीत कारवाई; पाच पीडित महिलांची सुटका

स्पाच्या नावे वेश्याव्यवसाय, खराडीत कारवाई; पाच पीडित महिलांची सुटका

मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा खराडी पोलिसांनी पर्दाफाश करीत येथून पाच पीडित महिलांची सुटका केली. यामध्ये नागालॅण्ड, पश्चिम बंगाल, राजस्थानमधील महिलांचा समावेश आहे. खराडीतील ‘ग्लोबल बिझनेस हब’ मर्धाल ‘सेलेस्टिया द वेलनेस स्पा’ येथे ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात स्पा सेंटरच्या मालकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अल्पवयीन मॅनेजरला ताब्यात घेतले. स्पा सेंटरमालक कफील उद्दीन (वय ३०, रा. आसाम) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून, तो फरार आहे. याबाबत महिला पोलीस अंमलदार वैशाली खेडेकर यांनी फिर्याद दिली आहे.

‘सेलेस्टिया द वेलनेस स्पा’ येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती खराडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने येथे छापा टाकला. येथून पोलिसांनी पाच पीडित महिलांची सुटका केली, तर अल्पवयीन मॅनेजरला ताब्यात घेतले. मॅनेजरसह त्याच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोनाली भदे, अंमलदार नवनाथ वाळके, सुरेंद्र साबळे, अमोल भिसे, महेश नाणेकर, वैशाली खेडेकर, पूजा डहाळे, कोमल वाकचौरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;