सावधान! कोरोना हातपाय पसरतोय; देशभरात कोरोना रुग्णांची संख्या 3 हजारांवर पोहचली, केरळ, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
देशासह जगभरात वाढत्या कोरोनामुळे चिंतेचे वातावरण आहे. देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशभरात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 3000 वर गेली आहे. तसेच केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 3,395 झाली आहे. तर गेल्या 24 तासांत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये सर्वाधिक 1336 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात 467 रुग्ण आहेत.
दिल्ली, केरळ, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 22 मे रोजी फक्त 257 सक्रिय रुग्ण होते, तर 26 मे रोजी हा आकडा 1010 पर्यंत वाढला आणि आता तो 3395 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत 685 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. बहुतेक रुग्ण आयसोलेशनमध्ये आहेत आणि संसर्गाची तीव्रता कमी आहे, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, परंतु सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
पश्चिम आणि दक्षिण भारतातून घेतलेल्या नमुन्यांच्या जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये असे आढळून आले की ओमिक्रॉनचे 4 उपप्रकार – LF.7, XFG, JN.1 आणि NB.1.8.1 हे सध्याच्या प्रकरणांसाठी जबाबदार आहेत. यापैकी पहिले तीन उपप्रकार अधिक प्रकरणांमध्ये आढळले आहेत. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. यावेळी घाबरण्याची गरज नाही, परंतु सर्वांनी सतर्क आणि सावधगिरी बाळगली पाहिजे. तज्ञांनी लोकांना मास्क घालण्याचे, गर्दी टाळण्याचे आणि गरज पडल्यास चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचे हे नवीन रुग्ण गंभीर नसतील, परंतु संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी जागरूकता आणि दक्षता खूप महत्वाची आहे, असेही सांगण्यात आले.
कोरोनाचे वाढते रुग्ण आणि शाळा पुन्हा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने सर्व पालकांना ताप, खोकला, सर्दी किंवा इतर कोविड सदृश लक्षणे आढळल्यास मुलांना शाळेत पाठवू नये असे आवाहन करणारे परिपत्रक जारी केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List