शिक्षकांनी विद्यार्थ्याला ओरडणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

शिक्षकांनी विद्यार्थ्याला ओरडणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

शाळेमध्ये शिक्षक मुलांना चांगले संस्कार करण्याच्या हेतूने ओरडत असतात. यावरुन शिक्षकांना दोष देता येणार नाही. याचसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. शिक्षकांनी कोणत्याही विद्यार्थ्याला ओरडणे हा संबंधित विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ठरत नाही, असा निर्वाळा न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमनुल्लाह आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने दिला आहे. हा निर्वाळा देत खंडपीठाने तामिळनाडूतील शिक्षकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यातून दोषमुक्त केले.

यापूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने अपिलकर्त्या शिक्षकाला भारतीय दंड संहितेच्या कलम 306 अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्यातून दोषमुक्त करण्यास नकार दिला होता. त्या निर्णयाला शिक्षकाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायमूर्ती अमनुल्लाह यांच्या खंडपीठाने मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवत शिक्षकाला मोठा दिलासा दिला.

शिक्षक ओरडल्याच्या कारणावरुन विद्यार्थ्याने स्वतःचा जीव घेतल्याची दुःखद घटना घडेल, अशी कल्पनाही कोणत्याही सामान्य व्यक्तीला करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप सिद्ध करण्यासाठी चिथावणी देणे किंवा कृत्य करण्यास जाणूनबुजून मदत करणे यासारखे घटक सिद्ध करणे आवश्यक आहे. अशा घटकांच्या सबळ पुराव्यांशिवाय आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा सिद्ध होत नाही, असे न्यायालयाने म्हटले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;